Next
नवसारीत पहिले मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन होणार
अपोलो हॉस्पिटलच्या माध्यामतून कामकाजाचे व्यवस्थापन
प्रेस रिलीज
Monday, June 03, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लार्सन अँड टुब्रोचे समूहाचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी स्थापन केलेल्या निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्टतर्फे  (एनएमएमटी) गुजरातमधील नवसारी येथे मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केला जाणार आहे. या हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि कामकाज अपोलो हॉस्पिटल समूहाद्वारे हाताळले जाईल. या संदर्भातील करारावर नाईक आणि अपोलो हॉस्पिटल समूहाचे अधयक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी नुकत्याच सह्या केल्या.

नाईक यांची नात निराली हिचे वयाच्या दुसऱ्या वर्षी कर्करोगाने निधन झाल्यानंतर नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनी गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी ‘एनएमएमटी’ची स्थापना केली. नाईक यांनी स्थापन केलेल्या ‘एनएमएमटी’द्वारे वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवी काम केले जात असून, त्यांच्याकडे या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी लागणारी जमीन उपलब्ध आहे. मूलभूत सुविधा उभारण्याचे काम, वैद्यकीय उपकरणे बसवणे, हॉस्पिटल चालवण्यासाठी मान्यताप्राप्त डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे काम ‘एनएमएमटी’द्वारे केले जाणार आहे. अपोलो हॉस्पिटल्स समूहाद्वारे त्यांचे वैद्यकीय ज्ञान उपलब्ध केले जाईल तसेच हॉस्पिटलचे कामकाज व देखभाल केली जाईल.

या विषयी बोलताना नाईक म्हणाले, ‘आपण ज्या समाजात राहतो, त्याचे देणे लागतो तसेच लोकांचे ऋण आपल्यावर असते. ग्रामीण आणि वंचित सामाजिक गटांना सर्वोत्तम माध्यमिक आणि तृतीयांश दर्जाची वैद्यकीय सेवा पुरवण्याचा निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्टचा प्रयत्न आहे. मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्याचा उपक्रम हे सर्वांना वाजवी किंमतीत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. दक्षिण गुजरातमधील नवसारी येथे हे उभारल्या जात असलेल्या या मिशनमध्ये प्रतिष्ठित अपोलो हॉस्पिटल्स समूह सहभागी होत असल्याचा आम्हाला आनंद वाटतो.’

‘अपोलो’चे अध्यक्ष डॉ. रेड्डी म्हणाले, ‘३५ वर्षांपूर्वी स्थापना झाल्यापासून अपोलो हॉस्पिटल्सने प्रत्येक व्यक्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचे एकमेव ध्येय ठेवले आहे. तेव्हापासूनच आम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न हे ध्येय साकारण्याच्या दिशेने विचारपूर्वक टाकलेले पाऊल आहे. नवसारी येथे मल्टी-स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्याच्या नाईक यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाठिंबा देताना ‘अपोलो’ला सन्मान वाटत असून, त्याद्वारे या परिसरातील लोकांना आजाराचे वेळेवर निदान आणि वेळेवर उपचार मिळतील व पर्यायाने अमूल्य जीव वाचतील.’ 

‘एनएमएमटी’ने सिसोदरा (गणेश), नवसारी, गुजरात येथे स्थित असलेल्या ‘ए. एम. नाईक हेल्थकेअर कॉम्प्लेक्स’चा विकास केला आहे. हे कॉम्प्लेक्स आठ एकरांच्या घरात पसरलेले असून, तेथे कर्करोग हॉस्पिटलची बांधणी केली आहे. याच जागेत मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि इतर वैद्यकीय सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या कॉम्प्लेक्समधील निराली कॅन्सर हॉस्पिटलचे कामकाम आणि व्यवस्थापन टाटा ट्रस्टद्वारे हाताळले जाणार आहे. दक्षिण गुजरातमधल्या प्रादेशिक भागात सर्वोत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

‘एनएमएमटी’द्वारे सुरत येथे निराली मेमोरियल रेडिएशन सेंटर, पवई येथे मल्टीडिसिप्लिनरी हॉस्पिटल चालवले जाते आणि खारेल, दक्षिण गुजरात येथे आधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. ‘एनएमएमटी’सह नाईक यांनी नाईक चॅरिटेबल ट्रस्टची (एनसीटी) स्थापना केली आहे. याच्यामार्फत समाजातील वंचित घटकांना दर्जेदार शिक्षण आणि व्यावायिक प्रशिक्षण दिले जाते. नाईक हे पद्मविभूषण, तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search