Next
बिनचेहऱ्याची माणसं
BOI
Monday, May 14 | 10:05 AM
15 0 0
Share this story

हाडाच्या पत्रकाराला ओढ असते, ती एखाद्या घटनेमागे वास्तव शोधण्याची, बातमीमागची बातमी शोधण्याची, तशीच प्रत्येक चेहऱ्यामागचा माणूस शोधण्याची. अतुल कुलकर्णी यांनी याच ओढीतून हे पुस्तक लिहिले आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने वाचकांसमोर सादर केले आहे. ही बिनचेहऱ्याची माणसे म्हणजे मुंबईतला सामान्य माणूस.

हे सगळेजण काहीतरी करण्याची, काहीतरी बनण्याची जिद्द बाळगून मुंबईत आले आहेत. त्यांची कौटुंबिक, आर्थिक स्थितीही वेगळी आहे. प्रत्येकाची व्यथा वेगळी आहे कोणी वडील आहे, तर कुणी मुलगा, कुणी पारशी तरुणी आहे, कुणी ज्येष्ठ नागरिक आहे, तर कुणी तरुण जोडपे आहे. असे मुंबईचे प्रातिनिधिक दर्शन घडतानाच मुंबईतील सामाजिक स्थितीही त्यातून समोर येते. हे जसे शब्दांमधून येते, तसेच प्रकाश बाळ जोशी यांच्या चित्रांमधून आणि अच्चुत पालव यांच्या अक्षरलेखनामधून.

प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स, स्पंदन पब्लिकेशन
पाने : १२८
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link