Next
डॉ. आंबेडकरांवरील दुर्मीळ व्यंगचित्रांचा ऐतिहासिक वारसा आता पुस्तक रूपात
BOI
Tuesday, July 02, 2019 | 12:16 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली विविध व्यंगचित्रे आता पुस्तक रूपात उपलब्ध करण्यात आली आहेत. ‘नो लाफिंग मॅटर : दी आंबेडकर कार्टून्स - १९३२-१९५६’ असे या पुस्तकाचे नाव असून, नुकतेच याचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले. दिल्लीतील नवयान प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

‘डॉ. आंबेडकरांवर १९३२ ते १९५६ या कालावधीत इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली सुमारे १२० व्यंगचित्रे या पुस्तकात संग्रहित करण्यात आली आहेत. आजच्या काळात या व्यंगचित्रांमधील व्यक्तींचे प्रसंगांचे संदर्भ नवीन पिढीला माहिती असण्याची शक्यता अगदीच कमी असल्यामुळे यातील प्रत्येक व्यंगचित्राला संपादकांनी विस्तृत टिपण दिले आहे. त्यामुळे एक ऐतिहासिक वारसा या पुस्तकामुळे जतन झाला आहे,’ अशी माहिती डॉ. अविनाश कोल्हे यांनी दिली. 

दलित नेते म्हणून उदयाला आलेले डॉ. आंबेडकर यांचे नेतृत्व, स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचा संघर्ष आणि स्वातंत्र्यानंतर कायदेतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून झालेली त्यांची वाटचाल यातील महत्त्वाचे टप्पे, घडामोडी यावर भाष्य करणारी व्यंगचित्रे या पुस्तकात आहेत. व्यंगचित्रकार शंकर यांच्यासह अनेक व्यंगचित्रकारांनी ही चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या घटना एका वेगळ्या दृष्टिकोनातून समोर येतात. उन्नामती श्यामसुंदर या युवा अभ्यासू व्यंगचित्रकाराने हे पुस्तक तयार केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 98 Days ago
Valuable addition to literature and history . Original source of informatuion for future historians .
0
0

Select Language
Share Link
 
Search