Next
प्रमोद कोपर्डे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर
अजय कांडर, अन्वर हुसेन, सुनीता डागा, अनिल साबळे, लता ऐवळे, इरफान मुजावर मानकरी
BOI
Wednesday, September 05, 2018 | 04:33 PM
15 0 0
Share this article:

अजय कांडर
सातारा : येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचे साहित्य, कला, संस्कृती व समाज परिवर्तनासाठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये कणकवली येथील साहित्यिक अजय कांडर यांच्यासह अन्वर हुसेन, सुनीता डागा, अनिल साबळे, लता ऐवळे आणि इरफान मुजावर यांचा समावेश आहे. 

अन्वर हुसेन
‘प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड दहा हजार रुपयांचे चार व पाच हजार रुपयांचे दोन असे एकूण सहा पुरस्कार देण्यात येतात. त्याचे हे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी पंचवीस हजार रुपयांचे दोन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले. त्यासह पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. यंदा अजय कांडर यांची कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कारासाठी निवड झाली असून, दहा हजाराचा धनादेश, मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. मनोहर कोपर्डे स्मृती कला पुरस्कार इस्लामपूर येथील चित्रकार अन्वर हुसेन यांना देण्यात येणार आहे.  

सुनीता डागा
पुण्यातील लेखिका सुनीता डागा यांना डॉ. चंद्रशेखर जहागीरदार स्मृती संस्कृती पुरस्कार, जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे यांना हुतात्मा विलास ढाणे स्मृती समाज परिवर्तन पुरस्कार देण्यात येणार आहे. 

लता ऐवळे
नवोदितांसाठी असलेल्या राधाबाई किसन कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कारासाठी आष्टा येथील लता ऐवळे यांची, तर पारुबाई भानुदास परदेशी स्मृती कला पुरस्कारासाठी सांगलीचे इरफान मुजावर यांची निवड करण्यात आली आहे. 

पुरस्कार वितरण गांधी जयंती दिनी दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य अण्णासाहेब होवाळे यांच्या हस्ते होणार आहे’,अशी माहिती प्रमोद कोपर्डे यांनी दिली.

इरफान मुजावर
‘पुरस्कार निवडीचे काम प्रतिष्ठानचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, समीक्षक डॉ. गजानन अपिने व प्रमोद कोपर्डे यांच्या समितीने पाहिले. प्रतिष्ठानच्या विश्वस्तांमध्ये अॅड. श्रेयश कोळेकर-कराड, ज्योत्स्ना पाटील-शिंदे-मुंबई, सातारचे रंगकर्मी चंद्रकांत कांबिरे व कवी वसंत शिंदे यांचा समावेश आहे’, असेही त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search