Next
सिंहगड स्पोर्ट्स करंडकचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, January 09, 2019 | 12:28 PM
15 0 0
Share this storyपुणे : कुसगाव येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्‍या सिंहगड स्पोर्ट्स करंडकअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल स्टुडंट्स टूर्नामेंट सिंहगड इन्स्टिट्यूटच्या लोणावळा संकुलामध्ये झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी रियाझ बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी लोणावळा संकुलाचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, सिंहगड स्पोर्ट्स करंडकचे क्रीडा संचालक प्राचार्य डॉ. मिलिंद रोहकले यांसह महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य उपस्थित होते. पुणे विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत असलेल्या सुदान, नेपाळ, श्रीलंका, इराक, अफगानिस्तान, येमेन व टांझानिया या देशातील एकूण २६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल व व्हॉलीबॉल या प्रकारांमध्ये आयोजित केल्या आहेत.

पाच जानेवारीला झालेल्या मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान अ विरुद्ध अफगान लॉयन या सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने १३ ओव्हरमधे आठ बाद १०२ धावा केल्या. अफगान लॉयन संघाने सहा बाद ९५ धावा केल्या. श्रीलंका विरुद्ध नेपाळ या सामन्यात श्रीलंका संघाने चार बाद ८४ धावा केल्या. नेपाळ संघाने आठ बाद ८१ धावा केल्या. मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत श्रीलंका विरुद्ध नेपाळ अशा झालेल्या सामन्यांत नेपाळ संघाने ४-१ असा विजय मिळविला.

मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत साउथ सुदान विरुद्ध नेपाळ या सामन्यात साउथ सुदान संघाने ३७-२१ असा विजय मिळविला. मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्ध साउथ सुदान या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने २-१ असा विजय मिळविला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr kn gujar About 72 Days ago
Very excellent and well coordinated
0
0

Select Language
Share Link