Next
‘टिमवि’चा जपानमधील विद्यापीठाशी सामंजस्य करार
BOI
Saturday, January 19, 2019 | 01:32 PM
15 0 0
Share this article:

पुणे : विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांच्या आदान-प्रदानासाठी ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (टिमवि)’ आणि जपानमधील ‘कांदा युनिव्हर्सिटी ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. येत्या २५ जानेवारीला पुण्यात हा करार करण्यात येणार आहे. 

‘कांदा युनिव्हर्सिटी’शी होत असलेल्या या करारामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जपानी भाषेतील अग्रीम शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी (२५ जानेवारी) विद्यापीठाच्या मुकुंदनगर येथील संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी कांदा विद्यापीठाचे अध्यक्ष  एम. सानो, टी. मियायुची, उपाध्यक्ष रॉबर्ट डिसिल्वा, के. मात्सुशिता आणि टी. इचिकावा हे उपस्थित राहणार आहेत. 

गेल्या १० वर्षांत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने जपानमधील वेगवेगळ्या सात विद्यापीठांशी करार केले आहेत. त्यांतर्गत आजवर ‘टिमवि’च्या जवळपास १२५ विद्यार्थ्यांना जपानमधील विविध अभ्यास प्रकल्पांसाठी जाण्याची संधी मिळाली. जपान आणि भारतातील उद्योग क्षेत्रात जपानी भाषा येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ‘मागील नऊ वर्षांत ‘टिमवि’तून बी. ए. करून बाहेर पडलेल्या १५०पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात नोकऱ्या मिळाल्या आहेत. बी. ए. झाल्यानंतर एम. ए. साठी विद्यार्थी आमच्या हाती लागतच नाहीत, त्यांना लगेच नोकरी मिळते’, अशी माहिती ‘टिमवि’च्या जपानी भाषा विभागाने दिली. फेब्रुवारी महिन्यात ‘टिमवि’च्या १० विद्यार्थीनी हिरोशिमा येथे अभ्यास दौऱ्यासाठी जात असल्याची माहितीही देण्यात आली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search