Next
‘लाईफ फिटनेस’च्या पुण्यातील पहिल्या स्टोअरचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, June 04 | 04:17 PM
15 0 0
Share this story

पहिल्या ‘लाईफ फिटनेस कन्सेप्ट स्टोअर’चे उद्घाटन अभिनेत्री नुश्रत भरुचा हिच्या हस्ते झाले. या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहन गुप्ता, विक्री विभागाच्या संचालक शिखा गुप्ता, अरुणा गुप्ता, अभिमन्यू साबळे, राहुल पुसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे :  तंदुरुस्ती उद्योगातील नामांकित कंपनी असलेल्या ‘लाईफ फिटनेस’च्या पहिल्या ‘लाईफ फिटनेस कन्सेप्ट स्टोअर’चे उद्घाटन नुकतेच येथे अभिनेत्री नुश्रत भरुचा हिच्या हस्ते झाले. या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहन गुप्ता, विक्री विभागाच्या संचालक शिखा गुप्ता, अरुणा गुप्ता, अभिमन्यू साबळे, रोहन पुसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे नवे ‘लाईफ फिटनेस कन्सेप्ट स्टोअर’ सेनापती बापट  मार्गावरील आयसीसी टेक पार्क येथे आहे. 

या वेळी नुश्रत भरुचा म्हणाली, ‘लाईफ फिटनेस हे तंदुरुस्ती (फिटनेस) उद्योगातील प्रथितयश नाव असून, ही कंपनी जगभर फिटनेस सोल्यूशन्स पुरवते. आजच्या वेगवान जीवनशैलीच्या काळात तंदुरुस्त राहणे ही प्रत्येकासाठी प्राधान्याची बाब ठरली पाहिजे.’

लाईफ फिटनेस ही तंदुरुस्ती उद्योगातील नामांकित कंपनी असून, हॅमर स्ट्रेंग्थ, एस्केप, सायफिट, आयसीजी या ब्रँड्सअंतर्गत तीनशे कार्डिओ व स्ट्रेंग्थ-ट्रेनिंग मशीन्स, तसेच सेवा पुरवते. देशभरातील हजारो तंदुरुस्ती सुविधांना तिने गरजेनुरुप कार्डिओव्हॅस्क्युलर व स्ट्रेंग्थ ट्रेनिंग सोल्यूशन्स पुरवली आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link