Next
‘टीसीएल’ची स्मार्ट टीव्ही ब्रँड दाखल करण्याची योजना
प्रेस रिलीज
Monday, April 23 | 03:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जगातील सर्वोच्च तीन टीव्ही उत्पादकांपैकी एक टीसीएल मल्टीमीडियाने, भारतात नवीन स्मार्ट टीव्ही ब्रँड दाखल करण्याची योजना जाहीर केली आहे. अभिनव स्मार्ट टीव्हीच्या श्रेणीच्या माध्यमातून देशातील ग्राहकांना उत्तम ऑडिओ आणि व्हिजुअल अनुभव देईल, असे एक हाय कस्टमाइज्ड, वन स्टॉप टेक्नॉलॉजीकल सोल्यूशन प्रदान करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

या पुढाकाराद्वारे ‘टीसीएल’चे कंज्युमर इलेक्ट्रॉनिक डोमेनमध्ये त्यांच्या नेतृत्वाची स्थिती अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, विशेषत: जागतिक एलसीडी टीव्ही विभागात जेथे त्यांचे तिसरे स्थान अबाधित आहे. सध्या एकूण बाजारपेठेतील ‘टीसीएल’चा हिस्सा १०.९ टक्के इतका आहे.

देशभरात अभिनव स्मार्ट टीव्ही ऑफरिंगची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत नवीन ब्रँड तयार करण्यात आला असून, तो ‘टीसीएल’च्या स्मार्ट होम अप्लायन्स ब्रॅंडच्या रूपात स्थित आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि उच्च दर्जाचे इंटरनेट मनोरंजनाद्वारे उत्तम ऑडिओ आणि व्हिज्युअल अनुभव प्रदान करेल. नवीन ब्रँड उच्च दर्जाचा कंटेंट, स्मार्ट तंत्रज्ञान, शक्तिशाली हार्डवेअरवर काम करेल आणि वापरकर्त्यांना सर्वात परिपूर्ण आणि समृद्ध मनोरंजन अनुभव प्रदान करेल.

‘टीसीएल इंडिया’चे कंट्री मॅनेजर माईक चेन म्हणाले, ‘आमच्या नवीन टीव्ही ब्रँडच्या माध्यमातून आम्ही भारतीय ग्राहकांना एक स्मार्ट, वन स्टॉप सोल्यूशन देऊ इच्छितो जे ग्राहकांच्या विभिन्न गरजा पूर्ण करेल. भारतातील ग्राहकांच्या गृह मनोरंजनात बदल घडवून आणण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि उच्च दर्जाच्या कंटेंटद्वारे त्यांचे जीवन समृद्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link