Next
‘डसॉल्ट सिस्टिम्स फाउंडेशन्स’तर्फे आकृती डिझाईन स्पर्धेची घोषणा
प्रेस रिलीज
Tuesday, July 31, 2018 | 06:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘डसॉल्ट सिस्टिम्स फाउंडेशन्स’ यांनी ‘आकृती २०१८’ या त्यांच्या देशव्यापी डिझाईन स्पर्धेची घोषणा केली आहे. यावर्षी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने, कृषीक्षेत्रासाठी यंत्रे आणि अवजारे,  काटकसर-पुनर्वापर-पुनरुज्जीवन-शुद्धीकरण, सौर/वायू उर्जांवर आधारित उपयुक्त साधने या संकल्पना देण्यात आल्या आहेत. ‘आकृती २०१८’ ची अंतिम फेरी डसॉल्ट सिस्टिम्सच्या हिंजवडी येथील ‘थ्री डीएलपीएम’ परिसरात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची शेवटची तारीख सहा ऑगस्ट २०१८ आहे. 

या स्पर्धेतील विजेत्यांना घसघशीत रोख बक्षिसांसह नोकरीच्या संधी, विजेत्या प्रकल्पांच्या विकासासाठी मदत आदी पारितोषिके मिळणार आहेत. विजेत्या संघासाठी सर्वाधिक आकर्षक गोष्ट म्हणजे अमेरिकेतील डल्लास टेक्सास येथील ‘सॉलिडवर्क्स वर्ल्ड २०१९’ या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. 

देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना त्यांची कलात्मक विचारशक्ती, डिझाईन कौशल्य आणि अंगभूत प्रतिभा लोकांसमोर आणण्यासाठी ‘आकृती २०१८’ हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. याद्वारे व्यावसायिक वापरासाठी योग्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी नवनवीन उत्पादने तयार करण्यासठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते. या स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी त्यांच्या पसंतीची डिझाईन अॅप्स वापरू शकतील, शिवाय सर्व सहभागी संघांना  डसॉल्ट सिस्टिम्स फाउंडेशन्सतर्फे ‘सॉलिडवर्क्स एज्युकेशन एडिशन’ मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाईल.
 
डसॉल्ट सिस्टिम्स – सॉलिडवर्क्सचे वरिष्ठ संचालक पी. एम. रविकुमार म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांमध्ये ‘आकृती’ ही भारतातील एक महत्वाची डिझाईन स्पर्धा ठरली आहे. २१ राज्यांमधील १९६ महाविद्यालयांमधील सुमारे ८५०पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेत मागच्या वर्षी सहभागी झाले होते. हा आकडा झपाट्याने वाढतोच आहे आणि परिणामकारक असे बरेच प्रकल्प ज्युरींसमोर आले आहेत. मागच्या वर्षी पुण्यातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला लॉस एंजेलिस येथे झालेल्या ‘सॉलिडवर्क्स वर्ल्ड २०१८’ मध्ये ‘स्मार्ट प्रॉडक्ट फॉर वेस्ट मॅनेजमेंट अँड रीयुज’ या विभागात कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली होती. विद्यार्थ्यांची प्रतिभा जोपासणे आणि त्यांना भविष्यकाळ घडवणारी पिढी म्हणून संधी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दर वर्षी ही स्पर्धा देशहिताच्या निरनिराळ्या संकल्पना राबवते. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रतिसाद त्यांच्या नाविन्यपूर्ण डिझाइन्स आणि कल्पनांच्याद्वारे आमच्या अपेक्षेहून खूप जास्त असतो.ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.’

‘थ्री डीएलपीएम डसॉल्ट सिस्टिम्स’ यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन मोगासले म्हणाले, ‘आकृतीविषयीचा उत्साह दरवर्षी वाढतच आहे. प्रतिभाशाली, उदयोन्मुख विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना विज्ञान, अभियांत्रिकी, वित्त, लोक-व्यवस्थापन क्षेत्रातील दिग्गज ज्युरींसमोर सादर करताना पाहून खूप आनंद होतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येतील आणि ग्रामीण भागात उत्पादित करता येतील अशी उत्पादने तयार करण्याकडे यावर्षी आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातला कुठलाही कारागीर एखादे नाविन्यपूर्ण उत्पादन तयार करून स्थानिक समाजासाठी ते उपलब्ध करून देऊ शकला पाहिजे. आमच्या पोर्टलवर जास्तीत जास्त स्पर्धक त्यांच्या नव्या आणि विकासशील अशा उत्पादनांची नोंदणी करतील, अशी आमची आशा आहे. अधिक माहितीसाठी http://www.3dplmsoftware.com/aakruti/ येथे संपर्क साधू शकतात.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link