Next
‘होंडा नवी’चे नवे मॉडेल बाजारात दाखल
प्रेस रिलीज
Saturday, July 21, 2018 | 01:59 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एचएमएसआय) ‘नवी’ची (NAVi) २०१८ची नवे मॉडेल सादर केली. स्टाइलिश इंधन मापक (फ्युएल गेज) आणि मेटल मफलर प्रोटेक्टर असल्याने ही बाइक जास्त सोयीस्कर बनली आहे.

नेहमीच्या घटकांबरोबरच बॉडीच्या रंगाशी सुसंगत अशी सुरक्षेची जाळी, हेडलाइट कव्हर, आरसे आणि स्पोर्टी रेड कलर कुशन स्प्रिंग आदी त्यात समाविष्ट करण्यात आल्याने या गाडीचा लूक अधिकच आकर्षक झाला आहे. हे नवे मॉडेल रेंजर ग्रीन आणि लडाख ब्राउन या दोन नव्या आकर्षक रंगात उपलब्ध आहे.

ऑटो एक्स्पो २०१६मध्ये नाविन्यपूर्ण ‘नवी’ सादर केल्यापासून तिने तरुणांचे लक्ष वेधून असून, केवळ राष्ट्रीयच नव्हे तर, लॅटीन अमेरिकासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही तिला उत्साहजनक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. २०१६मधील सादरीकरणानंतर बहुचर्चित असलेली ही दुचाकी आता २०१८मध्ये आपला मजबूत ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. विलक्षण लूक व्यतिरिक्त नियमित स्वरूपात ‘नवी’चे डिझाइन स्टेटमेंट आहे आणि कस्टमायझेशन पर्यायांमुळे ती सुखद बनली आहे.

या प्रसंगी ‘होंडा मोटारसायकल अॅंड स्कूटर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि पणन) यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘वैविध्यपूर्ण भारतीय दुचाकीच्या बाजारपेठेत ‘नवी’ ही तिच्या सुखद वैशिष्ट्यामुळे आपली छाप उमटवेल. काळानुरूप असलेली ‘नवी’ युवकांसाठी स्टाइलचे प्रतीक बनेल आणि नव्या २०१८च्या मॉडेलची अत्याधुनिकता तिला नव्या स्तरावर घेऊन जाईल. स्टाइलिश इंधन मापक आणि मफलर प्रोटेक्टर तसेच नवे आकर्षक रंग यासारख्या वैशिष्ट्यांमुळे वेगळेपणाचा ध्यास असलेल्यांना ही बाइक अनोखी झिंग देईल. आम्ही आमच्या ग्राहकांना कायमच चकीत करीत राहणार आणि बाइकस्वारांना आणखी आनंद देऊ.’

तोच-तोचपणा मोडून काढून १००-११० सीसी सेगमेंटमध्ये आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने होंडा आरएनडी इंडियाने प्रथमच १०० टक्के विकसित केलेले ‘नवी’ हे मॉडेल आहे. जिथे संकल्पना विकसित करून प्रत्यक्ष उत्पादन करण्यात आले. ‘होंडा’च्या सुखदतेचा डीएनए पुढे नेणारे ‘नवी’ मॉडेल हे अमर्यादित शक्यतांचे जग असल्याचे दाखवून देते.

‘होंडा नवी’ला १०९ सीसीचे इंजिन असून, त्याद्वारे सात हजार आरपीएममध्ये आठ पीएस बनते आणि ट्युबलेस टायरला ५ हजार ५०० आरपीएममध्ये ८.९६ एनएमची चक्राकार गती मिळते. पुढील बाजूस अपसाइड-डाउन टेलिस्कोपिक फोर्क असून, मागील बाजूस हायड्रॉलिक मोनोशॉक आहे. ‘नवी’ ही ४४ हजार ७७५ रुपये (दिल्लीत शोरूमबाहेर) या आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. ‘नवी’ पॅट्रिऑट रेड, शास्ता व्हाइट, स्पार्की ऑरेंज, काळी आणि नव्या रेंजर ग्रीन, नव्या लडाख ब्राउन या सहा रंगात उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link