Next
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पशुआरोग्य शिबिर
नागेश शिंदे
Saturday, February 09, 2019 | 10:16 AM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने तालुक्यातील मौजे सरसम येथे मोफत पशुआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश वाखरडकर, सह-क्रीडाशिक्षक प्रा. डॉ. डी. के. माने यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरार्थींच्या सहकार्याने या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात पशुचिकित्सा करण्यात आली आणि मोफत औषधोपचार व लसीकरण करण्यात आले. मौजे सरसम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकांनी आपल्या शेळ्या, गाय, बैल, म्हैस आदी पशूंवर उपचार करून घेतले. या वेळी हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एस. मादळे आणि व्ही. ए. पिल्लेवाड यांचे विशेष सहकार्य लाभले होते. प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
चंद्रशेखर शिरवाडकर About 152 Days ago
फारच चांगला उपक्रम आहे. ह्या कार्यशाळेचे पासेस ऑनलाईन उपलब्ध करता आले तर उत्तम.
0
1

Select Language
Share Link
 
Search