Next
‘स्कूल ऑफ आर्ट’च्या ‘आर्ट वॉक’ला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, January 29, 2019 | 03:48 PM
15 0 0
Share this story



पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या स्कूल ऑफ आर्ट अँड आर्ट अॅकॅडमीतर्फे आयोजित ‘आर्ट वॉक’ आणि ‘आर्ट एक्झिबिशन’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. २६ आणि २७ जानेवारी २०१९ रोजी हे प्रदर्शन आझम कॅंपस येथे भरविण्यात आले होते.

‘स्कूल ऑफ आर्ट’च्या ११व्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन  निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे   यांच्या हस्ते आणि निवृत्त मेजर जनरल श्री. पवार यांच्या उपस्थितीत झाले. युवा कलाकार गणेश कळसकर यांनी पोर्ट्रेट निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती मांडल्या होत्या. ‘स्कूल ऑफ आर्ट’च्या संचालक हेमा जैन, प्राचार्य भरत लोंढे यांनी संयोजन केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम आदी मान्यवर  उपस्थित होते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link