Next
‘भारतीय विद्या भवन’मध्ये रंगणार मंगळागौरीचे खेळ
BOI
Tuesday, September 04 | 02:25 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गुरुवारी, सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ‘मंगळागौर खेळ’ कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे’, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.  

‘सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५३ वा कार्यक्रम आहे. ‘मनस्विनी ग्रुप’च्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात येणार असून, मंगळागौरीतील तब्बल ५५ ते ६० खेळांचे सादरीकरण केले जाणार आहे. एकूण वीस महिलांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक खेळांची सांगड घातली जाणार आहे’, असेही काकिर्डे यांनी सांगितले.  

‘महाराष्ट्राचे अस्सल पारंपरिक खेळ म्हणून मंगळागौरीचे खेळ प्रसिद्ध आहेत. अशा पारंपरिक खेळांचा वारसा, त्याचे महत्व पुढच्या पिढीकडे नेण्याचे काम ‘मनस्विनी ग्रुप’ करीत आहे. गेली २५ वर्षे मंगळागौरीचे खेळ शिकवून, त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम संस्था करीत आहे. हे खेळ आपल्या आधुनिक जिमला पारंपरिक पर्याय कसे आहेत, त्या दृष्टीने शिकविले जातात. या खेळांच्या माध्यमातून व्यायाम देखील होतो. आपला हा अमूल्य वारसा जतन करण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत शिकलेल्या स्त्रिया अशा खेळांचे आयोजन करतात’, असे संस्थेच्या प्रमुख मंजिरी भागवत यांनी सांगितले.  

कार्यक्रमाविषयी 
मंगळागौरीचे खेळ
वेळ : गुरुवार, ६ सप्टेंबर, सायंकाळी सहा वाजता.
स्थळ : सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, भारतीय विद्या भवन, सेनापती बापट मार्ग.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link