Next
नंदकिशोर माटोडे पुणे ‘आयएसएचआरएई’च्या अध्यक्षपदी
प्रेस रिलीज
Thursday, March 14, 2019 | 03:11 PM
15 0 0
Share this story

पुणे : नंदकिशोर माटोडे यांची २०१९-२० या वर्षासाठी सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेशन अ‍ॅंड एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (आयएसएचआरएई) पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा व त्यांच्या मंडळाचा पदग्रहण समारंभ २२ मार्च २०१९ रोजी सायंकाळी सहा  वाजता हॉटेल रामी ग्रँड येथे होणार आहे.

माटोडे यांना या क्षेत्राचा १९हून अधिक वर्षांचा समृद्ध अनुभव असून, ते सध्या व्होल्टास लिमिटेड या आघाडीच्या कंपनीमध्ये क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. माटोडे यांच्या संचालक मंडळामध्ये वीरेंद्र बोराडे (सचिव), सतीश मेनन (खजिनदार) व दीपक वाणी (प्रेसिडेंट इलेक्ट) यांचा समावेश असेल.

नंदकिशोर माटोडे‘आयएसएचआरएई’ पुणे चॅप्टर या वर्षी आपला रौप्यमहोत्सव साजरा करीत असून, पदग्रहण समारंभाला २५ माजी अध्यक्ष उपस्थित राहतील. या कार्यक्रमामध्ये ‘एनव्हायरमेंटल कंट्रोल सिस्टिम अ‍ॅंड टनेल व्हेंटीलेशन सिस्टिम फॉर अंडरग्राउंड मेट्रो- अ पुणे परस्पेक्टीव्ह’ या तांत्रिक सत्राचे आयोजन केले असून, यात ‘व्होल्टास’मधील तज्ज्ञ जयंत देशपांडे मार्गदर्शन करतील.

या वर्षी ‘आयएसएचआरएई’ पुणे चॅप्टरची संकल्पना ‘सर्व्हिंग दी सोसायटी विथ न्यू एंथूझियाझम इन दी मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅंडन्ड रायझिंग स्टार चॅप्टर ऑफ आयएसएचआरएई कम्युनिटी’ अशी आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link