Next
‘क्विक हील’च्या संचालक मंडळात मनू परपिया
प्रेस रिलीज
Tuesday, May 22, 2018 | 11:23 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या आघाडीच्या आयटी सिक्युरिटी उत्पादने आणि सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने १० मे २०१८ पासून मनू परपिया यांची अतिरिक्त संचालक (स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा नुकतीच केली. आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत समभागधारकांच्या संमतीवर परपिया यांची नेमणूक अवलंबून आहे.

परपिया हे पीएलएम क्षेत्रातील आघाडीच्या जीओमेट्रिक लिमिटेडचे संस्थापक आहेत. काही काळापूर्वीपर्यंत ते या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आघाडीच्या जागतिक कंपन्यांना सेवा देणारी आणि सीएडी/पीएलएम क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी म्हणून या कंपनीची २०० दशलक्ष डॉलरपर्यंत होणारी वाढही त्यांनी अनुभवली.

परपिया यांनी कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटीतून केमिकल इंजिनीअरिंग, अमेरिकेतील हॉर्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधून एमबीए आणि इंग्लंडमधून फायनान्स अॅंड अकाउंटिंगमध्ये डिप्लोमा केले आहे.

‘क्विक हील’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश काटकर म्हणाले, ‘संचालक मंडळातर्फे मी परपिया यांचे ‘क्विक हिल’च्या संचालक मंडळात स्वागत करतो. परपिया यांचा आयटी क्षेत्रातील अनुभव ‘क्विक हील’ला आपले काम अधिक वाढवण्यात आणि सतत नवनव्या रूपात समोर येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी नवीन उत्पादने आणि वेगवान तंत्रज्ञान आणण्यात साह्य करेल.’

परपिया यांच्या नियुक्तीमुळे कंपनीच्या संचालक मंडळाची क्षमता नऊ सदस्यांपर्यंत वाढली आहे. यात परपिया यांच्यासह पाच स्वतंत्र संचालकांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search