Next
‘जना बँक’ बँकिंगची सुविधा उपलब्ध करणार
प्रेस रिलीज
Saturday, July 21, 2018 | 12:33 PM
15 0 0
Share this story

जना स्मॉल फायनान्स बँकेचे उद्घाटन करताना मान्यवर

मुंबई : जना स्मॉल फायनान्स बँकेने बँकिंग सेवा सुरू करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘वित्तीय समावेशी’ अजेंड्यानुसार, मायक्रो फायनान्स कंपनीचे बँकेमध्ये रूपांतरामुळे, जना स्मॉल फायनान्स बँकेच्या ४५ लाखांहून अधिक विद्यमान कर्जदारांना आपले ग्राहक बनवून त्यांना २०१८अखेरपर्यंत बँकिंग सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.

‘पैसे की कदर’ या घोषवाक्यानुसार बँकेने आपल्या ग्राहकांच्या मेहनतीने कामावलेल्या पैशांवर उत्तम परतावा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि म्हणून ३६६ दिवसांच्या मुदत ठेवींवर ८.५ टक्के व्याज आकाराची ऑफर दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीसाठी ९.१ टक्के व्याजदर देऊ केले आहेत; सेच समूह कर्ज असलेल्या ग्राहकांच्या पैशाचे मूल्य वाढविण्यासाठी बँकेने शून्य-शिल्लक-मूल बचत बँक ठेव खाते देऊ केले आहे.

या सेवेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी उप-गव्हर्नर आर. गांधी म्हणाले, ‘जना स्मॉल फायनान्स बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी येथे उपस्थित राहून मला आनंद झाला आहे आणि एमएफआय ते बँकेपर्यंतचा प्रवास ही फार मोठी प्रगती असून, मला खूप आनंद झालेला आहे. बँकेने भारतामध्ये आर्थिक समावेशनास चालना देण्यासाठी सुरू केलेल्या मिशनला मोठे यश मिळो ही सदिच्छा.’

जना स्मॉल फायनान्स बँकेचे गैर-कार्यकारी अध्यक्ष रमेश रामनाथन म्हणाले, ‘आमच्या बँकिंग प्रक्रियेच्या पूर्णपणे व्यावसायिक रूपांतरणामुळे आपल्या लाखो ग्राहकांच्या सेवेसाठी आम्ही एक पूर्ण-सेवा आर्थिक संस्था बनण्याचे आमचे वचन पूर्ण करीत आहोत. अद्यावत तंत्रज्ञानाच्या अवलंबनामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना देशभरात स्थानिक बँक म्हणून सेवा प्रदान करू शकणार आहोत. गरीब लोकांसाठीच नव्हे, तर आकांक्षायुक्त मध्यमवर्ग, तसेच लक्षावधी सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी आर्थिक समावेशन हे भारतासाठी एक प्रमुख आव्हान आहे.’

‘जना स्मॉल फायनान्स बँक राष्ट्रनिर्मित प्रयत्नांमध्ये आमची भूमिका पार पडण्यासाठी, आणि आमच्या ग्राहकांना आणि समुदायांना सेवा देणारी एक महत्त्वाकांक्षी भारताची एक अग्रणी डिजिटायझ्ड बँक बनण्याचे उद्दिष्ट साधण्यास कटिबद्ध आहोत,’ असे रामनाथन यांनी सांगितले.

जना स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कंवल म्हणाले, ‘जनाबँक ग्रामीण भारतामध्ये अधिकाधिक लोकांना बँकेची सेवा देण्यासाठी उत्सुक आहे. ग्रामीण भारताला बँकेच्या नेटवर्कशी जोडणे मोठे आव्हान आहे. त्याचप्रमाणे या मोहिमेला समर्पित बँकेसाठी उत्तम संधी आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही जवळपास ५०० हून अधिक जिल्ह्यांत जेथे बँकिंग उपलब्ध करून देणार आहोत तेथे नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देणार आहोत. आमचा प्रदीर्घ अनुभव, आमची ग्राहकांना आणि व्यावसायिकांना देण्यात येत असलेली सेवा लक्षात घेता, आमच्या बँकेची कीर्ती लवकरच घराघरा मध्ये पोहचेल.’

एक दशकाहून अधिक काळापासून, ‘जना’ टीम जास्तीत जास्त लोकांना औपचारिक आर्थिक प्रणालीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडे, कॅपिटल फायनांशियल इंटरनॅशनल (सीएफआय.कॉ.), लंडन यांनी जना टीमचे हे योगदान मान्य केले आणि त्यांना ‘द बेस्ट इनक्लुसिव्ह फायनान्शियल सर्व्हिस- इंडिया २०१८' म्हणून घोषित केले. आपल्या व्यापक ग्राहकांच्या आधार लक्षात ठेऊन बँकेने १५७ बँक शाखा सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये बँक नसलेल्या ग्रामीण भागातील १२ शाखांचा समावेश आहे.

२०१९ अखेरपर्यंत ‘जना बँके’च्या १९ राज्यांत ५०० शाखा सुरू होतील आणि त्यापैकी बहुतांश मायक्रो फायनान्स स्टोरफ्रंटचे बँक शाखांमध्ये रूपांतर झाल्यानंतर सुरू होतील. जना बँकेच्या १५० शाखा लहान आणि मध्यम उद्योगांना देखील सेवा पुरवतील. चालू वर्षाच्या अखेरीस त्याच्या सध्याच्या मनुष्यबळामध्ये आणखी एक हजार कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे आणि त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची योजना आहे.

प्रारंभी, ग्राहकांच्या विविध गरजा भागविण्यासाठी, बँक मायक्रो फायनान्स कर्जपुरवठा सुरू ठेवणार असून, सोबत व्यवसायिक कर्ज, कृषी कर्ज, परवडणारी गृहकर्ज आणि सोन्याच्या तारणावरील कर्जे यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून देणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link