Next
आसूसची ‘बॅक टू कॉलेज’ ऑफर
प्रेस रिलीज
Thursday, July 26, 2018 | 05:10 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘आसूस’ने ग्राहकांसाठी खास ‘बॅक टू कॉलेज’ ही सवलत योजना दाखल केली आहे. यामध्ये वाढीव वॉरंटी ते शून्य-खर्चाचे ईएमआय, मोफत कस्टमाइझ्ड आरओजी टी-शर्ट्ससह विविध लाभदायी पर्यायांचा समावेश आहे.  ही ऑफर ३० सप्टेंबरपर्यंत आहे. 

अलीकडे खरेदी केलेल्या कोणत्याही आसूस उत्पादनावर कंपनीने वाढीव वॉरंटी सुविधा देऊ केली आहे. नोटबुकवर ४९९ रुपये आणि गेमिंग नोटबुकवर ९९९ रुपये जादा भरून, वापरकर्त्यांना दोन वर्षांपर्यंतची विस्तारित वॉरंटी मिळू शकते. त्याशिवाय अनुक्रमे ९९९ आणि १४९९ रुपये जादा भरून ग्राहकांना तीन वर्षांच्या विस्तारित वॉरंटीचा लाभ घेता येईल. 

‘बॅक टू कॉलेज’ ऑफरअंतर्गत बजाज ईएमआयवर आसूस पीसी मासिक हप्त्यांवर खरेदी करता येऊ शकतो, ज्यावर शून्य खर्च आहे. आसूसच्या सर्व पीसी उत्पादनांवर ९ / ३ योजना लागू आहे. जर वापरकर्ते तीन हप्ते डाउन पेमेंट भरत असेल, तर उर्वरित रक्कम सहा समान मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध असून यात व्याज भरावे लागणार नाही. आसूसच्या दुकानातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी १८ / ६ योजना असून, विशेषतः झेनबुक सिरीज आणि गेमिंग मॉडेल्सवर आहे. यात वापरकर्त्यांनी सुरूवातीचे सहा हप्ते डाउनपेमेंटने भरल्यास उर्वरित रक्कम १२ समान मासिक हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

कोणत्याही आरओजी गेमिंग श्रेणी मॉडेलच्या खरेदीवर असूस वापरकर्त्याचे नाव छापलेले कस्टमाइझ्ड आरओजी टी-शर्ट देत आहे.  ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू असून, यासाठी वापरकर्त्यांना नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link