Next
रत्नागिरीत प्रमोद गणोरकर यांचे गायन सादर
खल्वायन संस्थेची २५६ वी मासिक संगीत सभा
BOI
Monday, February 18, 2019 | 02:12 PM
15 1 0
Share this story

खल्वायन संस्थेच्या सलग २५६व्या मासिक संगीत सभेत गाताना प्रमोद गणोरकर. सोबत तबल्यावर निखील रानडे आणि हार्मोनियमवर चैतन्य पटवर्धन.

रत्नागिरी : येथील खल्वायन या संस्थेची सलग २५६वी मासिक संगीत सभा शहरातील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात उत्साहात झाली. कुर्धे येथील महर्षी गणेश रामचंद्र बेहेरे व रामकृष्ण गणेश बेहेरेबुवा स्मृती मासिक संगीत सभा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या मैफलीत औरंगाबादचे प्रमोद गणोरकर यांनी शास्त्रीय गीते, तसेच अभंग, नाट्यगीते सादर केली.

प्रारंभी आसमंत बेनोव्हेलन्सचे नंदकुमार पटवर्धन यांच्या हस्ते नटराजपूजन, दीपप्रज्ज्वलन करून श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष संदीप शेट्ये यांच्या हस्ते कलाकारांना श्रीफळ, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे सचिव प्रदीप तेंडुलकर यांनी प्रास्ताविक केले आणि कलाकारांची ओळख करून दिली.

मैफलीची सुरुवात गणोरकर यांनी मारुबिहाग रागातील विलंबित एकतालात बद्ध असलेल्या बडा ख्यालाने केली. याला जोडून द्रुत त्रितालातील दोन बंदिशी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर ‘याचसाठी केला होता अट्टाहास’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ ही दोन पदे त्यांनी आपल्या सुरेल आवाजात सादर केली. तानांचा उत्कृष्ट लगाव, सुरेख आलापी, रागाचा उत्तम विस्तार, रागाची उत्कृष्ट मांडणी व भारदस्त आवाज यांमुळे मैफल रंगतदार झाली. शेवटी भैरवीतील अभंगाने त्यांनी  मैफलीची सांगता केली. चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम) व निखिल रानडे (तबला) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जांभेकर विद्यालय, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, राजू बर्वे, दिलीप केळकर, अविनाश पाटील, निरंजन गोडबोले आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मकरंद About 28 Days ago
खल्वायन संस्थेच्या या अथक परिश्रमाला सलाम, विनाखंड हा संगीतयज्ञ चालू ठेवणे सहज सोपे नाही
0
0

Select Language
Share Link