Next
‘सूर्यदत्ता’च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
प्रेस रिलीज
Tuesday, January 02, 2018 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

माजी विद्यार्थ्यांसमवेत केक कापताना संस्थेचे शिक्षण अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया.पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या माजी विद्यार्थ्यांचा ‘सूर्य मीलन– ग्रँड ॲल्युम्नी मीट २०१७’ हा महामेळावा नुकताच संस्थेच्या बावधन कँपसमध्ये उत्साहात झाला. ‘सूर्य मिलन’ या वार्षिक उपक्रमाचे हे १८वे वर्ष होते. या महोत्सवात शिक्षकांबरोबरच सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे ३००हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.  

‘सूर्यदत्ता’चे माजी विद्यार्थी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम करत आहेत. त्यामध्ये इन्फोसिस, नेस्ले इंडिया, व्होडाफोन, डॉइश बँक, फुजित्सू कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ईक्लर्क्स, श्रीराम जनरल इन्शुरन्स, बँक ऑफ न्यू यॉर्क मेलॉन, एअरटेल, मर्स्क लाईन, कोटक महिंद्र बँक, ॲक्सिस बँक, फेरेरो इंडिया, सन गार्ड, फिलिप्स लायटिंग इंडिया लिमिटेड, टाइम्स ऑफ इंडिया, ॲक्सेंच्युअर सॉफ्टवेअर, जस्ट डायल, क्रेडिट स्विस, बर्जर, कॅप्स्टन, रेनॉल्ड इन्फोटेक, झी मीडिया कॉर्पोरेशन, एक्साईड इंडस्ट्रीज आदी नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. काही विद्यार्थी उद्योजक बनले असून, त्यांच्या कंपन्यांत पियूष्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, फिटनेस ट्रेनर, ऑटो कॉप, चौधरी डेव्हलपर्स, कोचिंग इन्स्टिट्यूट्स आदींचा समावेश आहे.

या वेळी ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘आमचे २२ हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क असून, हे विद्यार्थी भारताच्या विविध भागांत, तर काहीजण परदेशांतही कार्यरत आहेत. माजी विद्यार्थी हे संस्थेचे ब्रँड अँबेसिडर असून त्यांचे कंपनी जगतातील कार्यच संस्थेविषयी सविस्तर समजण्याइतके पुरेसे बोलके आहे.’

प्रा. डॉ. चोरडिया यांनी आयुष्यात यशस्वी कसे व्हावे, याचे कानमंत्र विद्यार्थ्यांना दिले. ‘उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी सुस्पष्ट ध्येय-दृष्टीकोन असावा आणि सातत्यपूर्ण कृती करावी, ज्यायोगे विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. जीवनात उद्दिष्ट्य बाळगणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, प्रत्येकाने पहिले ध्येय गाठून दुसऱ्या ध्येयाकडे वाटचाल करताना गुणवत्तेची पातळी उंचवावी,’ असे त्यांनी सांगितले.

माजी विद्यार्थी पुष्कर लिंघारकर याने ‘सूर्यदत्ता’मधील अनुभवकथन केला; तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी आपण जीवनात जे काही मिळवले आहे, ती ‘सूर्यदत्ता’ची देणगी असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा कल्याणकारी विकास हा ‘सूर्यदत्ता’ने पुरवलेल्या साचातूनच शक्य झाल्याचे नमूद केले.  

‘सूर्यदत्ता’चे माजी विद्यार्थी ‘सूर्यन्स’ नावाने ओळखले जातात. ते आठवड्याला अथवा महिन्याला किमान दोन तास नव्या, तसेच सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आणि आपला कामाचा अनुभव विशद करण्यासाठी देणार आहेत. या ‘सूर्यन्स’ना त्यासाठी मानधन व प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे प्रा. चोरडिया यांनी सांगितले. या उपक्रमाचा उद्देश माजी विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन क्षेत्राविषयी रस निर्माण करणे व प्रशिक्षित उद्योग अनुभवी व्यक्तींद्वारे शिक्षण क्षेत्राची गरज भागवणे, हा आहे.

संस्थेचे शिक्षण अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया यांसह ‘सूर्यदत्ता’च्या कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांसमवेत केक कापला. मेळाव्याचा समारोप डीजे नाइट व भोजनाने झाला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search