Next
पडघ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरपंच उतरले पाण्यात
BOI
Tuesday, August 06, 2019 | 06:25 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी : ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील श्रमिकांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पडघ्यातील गणेशनगर येथील पूरग्रस्तांना ग्रामपंचायतीने तातडीने मदत केली. चार ऑगस्ट रोजी पहाटे ओहळाचे पाणी वस्तीतील घरांच्यात शिरल्याचे सरपंच पराग पाटोळे यांना समजताच कंबरभर पाण्यात ते स्वतः उतरले. ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने पूरग्रस्तांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. सकाळी नाश्ता, चहा व दुपारच्या जेवणाची आणि निवासाचीही व्यवस्था करण्यात आली. ‘पूरग्रस्तांनी घाबरून जाऊ नये, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,’ असे आश्वासन सरपंच पाटोळे यांनी दिले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer About 14 Days ago
मस्त
0
0

Select Language
Share Link
 
Search