Next
अभिनेत्री अपूर्वा कवडेची मनोरंजन क्षेत्रात भरारी
BOI
Friday, July 19, 2019 | 04:19 PM
15 0 0
Share this article:

अपूर्वा कवडेमुंबई : मनोरंजनसृष्टीत दररोज नवनवीन चेहरे दाखल होत असतात. परंतु ज्यांच्याकडे ‘टॅलेन्ट’ आहे तेच टिकून राहतात. एक नवा मराठमोळा चेहरा मनोरंजनसृष्टीत झेपावू पाहतोय, तो म्हणजे अपूर्वा कवडे. अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलेली अपूर्वा आता फॅशन शोज, लघूपट आणि चित्रपट अशा सर्व स्तरांवर काम करत हिंदी आणि मराठी सृष्टीत पाय रोवू पाहत आहे.

‘मिस फॅब’ या सौंदर्यस्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावत अपूर्वाने ग्लॅमरच्या दुनियेत पदार्पण केले. साहजिकच तिला फॅशन शोजमधून ‘रॅम्प-वॉक’ करण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. तिने मुंबई, गोवा येथील फॅशन शोज तर केलेच, परंतु थायलंडमधील आंतरराष्ट्रीय फॅशन शोजमध्येही आपली चमक दाखविली आहे. फॅशन शोजच्या दुनियेत अपूर्वाचे नाव आता प्रस्थापित झाले आहे. 

अनेक मॉडेल्सचा सौंदर्यस्पर्धा व फॅशन शोज यांनंतर पुढचा टप्पा अभिनय असतो. अपूर्वाने अभिनय केलेल्या ‘चिंध्या’ या  लघुपटाला २०१७मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी नामांकन मिळाले होते. अशा आशयघन चित्रपटाचा भाग होणे, हे तिच्या अभिनयक्षमतेबद्दल बरेच काही सांगून जाते. तिने नुकताच एक हिंदी चित्रपट केला आहे. ‘शुभरात्री’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिका करत असून तिच्यासोबत मेहुल गांधी व शाहिद मल्ल्या हे महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. वर्षा उसगावकर व अनुपसिंग ठाकूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली. यामुळे तिच्या अनुभवसंपन्नतेत भर पडली आहे. 

अपूर्वा एक चांगली अभिनेत्री तर आहेच, तशीच ती उत्तम नृत्यांगनादेखील आहे. लहानपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या अपूर्वाने बॉलिवूड डान्सिंग स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले गणेश आचार्य यांच्याकडे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. त्याचा फायदा असा झाला, की तिला संगीत अल्बमसाठी विचारणा झाली. तिने ‘सोनिया रांझणा’ हा हिंदी संगीत अल्बम केला, ज्यात तिने नृत्य आणि अभिनय असे दोन्ही केले आहे. तसेच तिचा अजून एक नवाकोरा मराठी संगीत अल्बम येऊ घातला आहे. ‘फंडूगिरी’ असे आजच्या पिढीला भावणारे नाव असलेला हा संगीत अल्बम मराठीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहन सातघरे दिग्दर्शित करत आहेत. अशा नामांकित दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणे हा अपूर्वासाठी एक महत्त्वाचा अनुभव असेल. यातून तरल अनुभव गाठीशी असेल असे तिचे मत आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search