Next
‘लघु उद्योजकांसाठी ‘महाटेक’ उत्तम व्यासपीठ’
‘थरमॅक्स लिमिटेड’चे कार्यकारी उपाध्यक्ष प्रवीण कर्वे यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, February 11, 2019 | 03:32 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘औद्योगिक लघु उद्योजकासाठी ‘महाटेक’ हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ आहे. लघु उद्योजकांनी योग्य व्यवसायप्रणालीच्या आधारे आपला व्यवसाय मोठा करावा,’ असे प्रतिपादन थरमॅक्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रवीण कर्वे यांनी केले.

पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय पटांगणावर ‘महाटेक- २०१९’ हे पंधरावे व्यावसायिक प्रदर्शन सात ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, बीएसई एसएमई बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे उप महाव्यवस्थापक आनंद चारी, ‘महाटेक’चे संस्थापक काकासाहेब मराठे, विनय मराठे, संचालक (महाराष्ट्र इंडस्ट्री डिरेक्टरी) हे उपस्थित होते.

‘महाटेक’मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे भारतीय सेवा क्षेत्रातील संधी यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते;  तसेच प्रत्येक विभागातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली होती. या प्रदर्शनात ३००हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनात प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या उद्योजकांपासून ते लघु उद्योजकांपर्यत आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅंडपर्यंत सर्व घटकांचा समावेश होता. प्रक्रिया, उपकरणे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, मशिनरी आणि मशीन टूल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि ऑटोमेशन उपकरणे या चार प्रकारांमध्ये प्रदर्शनाचे वर्गीकरण केले होते.

महापौर टिळक म्हणाल्या, ‘मराठी तरुणांनी जास्तीत जास्त प्रमाणात उद्योगांत उतरणे आवश्यक आहे. ‘महाटेक’सारखे व्यासपीठ हे नवीन उद्योजकांच्या व्यवसाय वाढीसाठी अत्यंत लाभदायक ठरत आहे. ‘स्मार्ट सिटी’ असलेले पुणे शहर हे एक व्यावसायिक केंद्र म्हणून पुढे येत आहे. यासाठीच येत्या काळात व्यावसायिक परिषद केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे.’

मराठे इन्फोटेकचे संचालक विनय मराठे म्हणाले, ‘शहरातील उद्योजक आणि नवीन उद्योजकांना माहिती मिळवून देण्याची ही उत्तम संधी आहे. ‘महाटेक’चे उद्दिष्ट हे उत्पादन क्षेत्राच्या वाढीस प्रोत्साहन देणे आणि यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रदर्शनासह ‘एसएमई’साठी चार वेगवेगळ्या परिषदेचे आयोजनदेखील केले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link