Next
‘बलुतं’च्या चाळिशीनिमित्त निबंध सादरीकरण स्पर्धा
BOI
Thursday, December 06, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या दया पवार यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात क्रांती घडवली. यंदा ‘बलुतं’ला चाळीस वर्ष होत आहेत. दलित आत्मकथनातून जे अनुभव व्यक्त झाले, त्यांनी मराठी साहित्याच्या मध्यमवर्गीय चौकटी लवचिक केल्या, मोकळ्या केल्या. अशा एखाद्या दलित आत्मकथनावर लिहिण्याकरिता ‘ग्रंथाली’ तरुणाईला आवाहन करीत आहे. 

या स्पर्धेत आठशे शब्दात निबंध लिहिणे आणि त्याचे सार पाच ते सात मिनिटात सादर करणे अपेक्षित आहे. ही स्पर्धा विद्याविहार (पूर्व) येथील ‘के. जे. सोमैया कला वाणिज्य महाविद्यालया’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून, ती १५ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल. लेखी स्वरुपात आपले निबंध संयोजकांकडे देणे अपेक्षित आहे. ‘सोमैया’चा मराठी विभाग व ‘ग्रंथाली’ यांच्या वतीने घेण्यात येणारी ही स्पर्धा ‘के. जे. सोमैया कला वाणिज्य महाविद्यालयात होईल. स्पर्धा विनामूल्य असेल. 

स्पर्धेचे नियम :
- नाव नोंदणी १० डिसेंबरपर्यंत २०१८ करणे अपेक्षित आहे. संपर्क : डॉ. वीणा सानेकर : ९८१९३५८४५६, अस्मिता सावंत: ९६१९२५०२११ (मेसेज अथवा व्हॉट्सअॅपवर कळवावे.)
- स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी (१५ डिसेंबर २०१८) सकाळी नऊ वाजता के. जे. सोमैया कला वाणिज्य महाविद्यालय, विद्याविहार (पूर्व) येथे उपस्थित राहावे. 
- निबंधात आत्मकथनाचे वर्ष, अनुभवविश्व, भाषा, आत्मकथनाने तुमच्या मनावर टाकलेला प्रभाव, मराठी आत्मकथनाच्या प्रवाहातील त्याचे वेगळेपण, आत्मकथनाचा स्वतंत्रपणे विचार करणे अपेक्षित आहे, संदर्भाचा आधार घेतल्यास त्यांचा उल्लेख करावा. 
- स्पर्धेच्या दिवशी निबंध लेखी स्वरुपात देणे बंधनकारक आहे. 

‘ग्रंथाली’ ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत, प्रथम पारितोषिक दोन हजार रुपये रोख व पुस्तकभेट, द्वितीय पारितोषिक एक हजार ५०० रुपये रोख व पुस्तकभेट आणि तृतीय पारितोषिक एक हजार रुपये रोख व पुस्तकभेट असे असेल. 

‘या स्पर्धेमध्ये अधिकाधिक संख्येने स्पर्धकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन ‘ग्रंथाली’तर्फे विश्वस्त सुदेश हिंगलास्पुरकर व कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search