Next
सॅमसंग गॅलेक्सी एस नाइन व एस नाइन प्लस
प्रेस रिलीज
Monday, March 12 | 12:11 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’ने ‘गॅलेक्सी एस नाइन’ व ‘एस नाइन प्लस’ हे नवीन स्मार्टफोन सहा मार्च रोजी बाजारात दाखल केले. ड्युएल अॅपर्चर लेन्स असलेला जगातील सर्वोत्तम कॅमेरा, सुपर स्लो-मोक्षमता, तुमच्यासारखे दिसणारे एआर ईमोजी आणि डॉल्बी अॅटमोस असलेले एकेजीने ट्युन केलेले स्टीरिओ स्पीकर्स, अशी अनोखी वैशिष्ट्ये यात आहेत.

गॅलेक्सी एस नाइन व एस नाइन प्लसमध्ये एकेजीने ट्युन केलेले स्टीरिओ स्पीकर्स, डॉल्बी अॅटमोसमुळे उत्तम ऑडिओ व सॅमसंगने गेल्या वर्षी आपल्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये समाविष्ट केलेला एज-टू-एज इन्फिनिटी डिस्प्ले समाविष्ट असल्याने मनोरंजनाची गुणवत्ताही वाढली आहे.
 
‘सॅमसंग नैऋत्य आशिया’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. होंग म्हणाले, ‘गॅलेक्सी एस नाइन आणि एस नाइन प्लस यांची निर्मिती प्रामुख्याने इमेजेस, व्हिडिओ व इमोजीद्वारे संवाद व अभिव्यक्ती होत असलेल्या, आजच्या आधुनिक काळासाठी करण्यात आली आहे. भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. गॅलेक्सी एस नाइन व एस नाइन प्लस तयार करताना आम्ही भारतातील आजच्या व उद्याच्या गरजा विचारात घेऊन, स्मार्टफोनमध्ये आवश्यक बदल केले आहेत.”

‘सॅमसंग इंडिया मोबाइल व्यवसाया’चे वरीष्ठ उपाध्यक्ष असीम वारसी म्हणाले, ‘गॅलेक्सी एस नाइन व एस नाइनप्लस या स्मार्टफोननी स्वतःची नवी श्रेणी निर्माण केली आहे. कॅमेऱ्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे ग्राहकांना अन्य कोणत्याही स्मार्टफोनने काढता येणार नाहीत, अशा प्रकारचे फोटो व व्हिडिओ आता काढता येतील. सुपर स्लो-मो व एआर ईमोजी अशा आकर्षक वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांना खास व वैयक्तिक पद्धतीने अभिव्यक्ती करता येईल. आघाडीच्या ऑपरेटरबरोबरच्या भागीदारीमुळे, गॅलेक्सी एस नाइन व एस नाइनप्लस ग्राहकांना जलद डाउनलोडसाठी व सुरळीत स्ट्रीमिंगसाठी वेगवान डाटाचा अनुभव घेता येईल. रिटेल व ऑपरेटरबरोबरच्या भागीदारीमुळे आम्ही हे स्मार्टफोन खरेदी करण्याच्या पद्धतींमध्येही बदल आणले आहेत. हे स्मार्टफोन दाखल करून सॅमसंग भारतातील स्मार्टफोन श्रेणीतील स्थान अधिक सक्षम करणार आहे.’ 

गॅलेक्सी एस नाइन व गॅलेक्सी एस नाइन प्लस यांची किंमत ६४ जीबीसाठी अनुक्रमे ५७,९०० व ६४,९०० रुपये आणि २५६ जीबीसाठी अनुक्रमे ६५,९०० व ७२,९०० रुपये आहे.
 
हे स्मार्टफोन १६ मार्च २०१८पासून भारतात उपलब्ध होतील. स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, कोरल ब्लू व लिलॅक पर्पल या तीन खास रंगांमध्ये मिळतील. हे स्मार्टफोन निवडक रिटेल स्टोअर, सॅमसंग शॉप आणि फ्लिपकार्ट येथे ऑनलाइन उपलब्ध होतील. गॅलेक्सी एस नाइन प्लसचा २५६ जीबी हा प्रकार रिलायन्स डिजिटल स्टोअर, सॅमसंगच्या स्टोअर व सॅमसंग शॉपद्वारे विकला जाईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link