Next
श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम
अजित कडकडे यांना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार जाहीर
BOI
Tuesday, February 19, 2019 | 01:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टच्या वतीने काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पालखीचे बुधवारी, २० फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता पुण्यात आगमन होणार असून, सायंकाळी साडेसहा वाजता मंडईतील श्री शारदा गजानन मंदिरापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. यानिमित्त २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान कॉंग्रेस भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

दर वर्षी प्रदान करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ पुरस्कार यंदा पंडित अजित कडकडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी, २४ फेब्रुवारी २०१९ रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. 

पंडित अजितकुमार कडकडे.
या कार्यक्रमांचे आयोजन अण्णा थोरात, विजय काजळे, विनायक घाटे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण यांनी केले आहे. पालखी सोहळ्याचे यंदा २३ वे वर्ष आहे. 

गुरुवारी, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता बाळासाहेब परदेशी यांच्या साई नवनाथ भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता अंध विद्यार्थ्यांचा ऑर्केस्ट्रा, तर शनिवारी, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता किरणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राजकुमार बार्शीकर यांचा सदा रंगबहार हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. 

रविवारी, २४ फेब्रुवारी रोजी दिवसभर रक्तदान शिबीर होणार आहे, तर सायंकाळी साडेसात वाजता महिलांच्या हस्ते महाआरती होणार असून, त्या आधी पंडित अजितकुमार कडकडे यांना सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. त्या आधी सायंकाळी साडेसहा वाजता योगेश तपस्वी यांचा स्वामी गीतसुगंध हा कार्यक्रम होणार आहे.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bharati anant kharesh About 32 Days ago
Shree swami samarth well in pune
0
0
Lata Ramesh Narwa About 33 Days ago
👌👌👍👍 nakki yenar
3
0

Select Language
Share Link