Next
म्हसोबा महाराज यात्रेला प्रारंभ
नाशिक शहरासह पंचक्रोशीतल्या भाविकांची हजेरी
BOI
Friday, March 15, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this story

म्हसोबा महाराज यात्रेत महाआरती करताना खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, अण्णा गुरुजी, ह. भ. प. त्र्यंबक बाबा भगत, सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर आणि पुजारी संतोष माळवे

नाशिक : शहरातील अध्यात्मिक वारसा असणारे देवळाली गाव आणि नाशिक रोडकरांचे ग्रामदैवत असणाऱ्या म्हसोबा महाराजांच्या यात्रेला १३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी देवळाली गावातील ग्रामस्थ मंडळी आणि पंचकमिटी यांच्या वतीने विविध धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम पार पडले. 

शहरातील या भव्य-दिव्य यात्रेला गेल्या साठ वर्षांची परंपरा आहे. एका बाजूला सिमेंटचे जंगल निर्माण होत असताना नाशिक रोड येथील देवळाली गावच्या पंच कमिटीने हा अध्यात्मिक आणि ग्रामीण वारसा टिकवून ठेवला आहे. यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमांमध्ये सकाळी सहा वाजता  अभिषेक करण्यात आला. प्रकाश चव्हाण, दीपक मालुंजकर प्रियंका चव्हाण यांना यंदाच्या अभिषेकाचा मान मिळाला. त्यानंतर म्हसोबाची विधिवत पूजा करण्यात आली. सिन्नर भूषण, त्र्यंबक बाबा भगत, अण्णा गणपती मंदिराचे सर्वेसर्वा अण्णा गुरुजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. 

तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. नाशिक रोड आणि उपनगर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी या यात्रेचे सुयोग्य प्रकारे नियोजन करत आहेत. यात्रेमुळे देवळाली कॅम्पकडे जाणारी वाहतुक ही काही वेळ वाढविण्यात आलेली असून संध्याकाळच्या वेळेत ही वाहतूक इतर रस्त्यांनी वळवली जाणार आहे. त्यासाठी नाशिक रोड कोर्टापर्यंत रस्ता काढण्यात आलेला असून भाविकांना पायी जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्यात आली आहे. यात्रेदरम्यान विविध खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थ उपाहारगृहे तसेच पूजेचे साहित्य विक्रीला ठेवण्यात आले आहे. भाविकांनी यात्रेला उपस्थित राहावे, असे आवाहन पंचकमिटीचे अॅडव्होकेट शांताराम बापू कदम, सूर्यकांत लवटे आणि पंचकमिटीच्या सदस्यांनी केले आहे. यंदा यात्रेसाठी एक लाख भाविक येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

या वेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ,  आ. बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, नगरसेवक आर. डी. धोंगडे, सूर्यकांत लवटे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, सरोज आहिरे, रंजना बोराडे, प्रशांत दिवे, संतोष पूजारी, माळवे हे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link