Next
‘असे’ व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करू नका
प्रशांत सिनकर
Tuesday, August 14, 2018 | 06:06 PM
15 0 0
Share this story

ठाणे : सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आले आहे. त्यामुळे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून स्वातंत्र्यदिनाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यदिनाशी संबंधित असलेल्या या मेसेजमध्ये ग्रीटिंग असून, ते उघडण्यासाठी अंगठ्याचा ठसा मागितला जातो. त्याबरोबरच अंगठ्याचा ठसा दिल्यास बँक खाते हॅक होईल, असे घाबरविणारे मेसेजही व्हायरल झाले आहेत; मात्र लोकांनी घाबरण्याची काही गरज नाही आणि असे मेसेज फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सायबरतज्ज्ञांनी केले आहे. 

‘मेसेज उघडण्यासाठी आपल्या अंगठ्याचा ठसा स्कॅन केल्यामुळे अॅप डेव्हलपरना आपल्या बायोमेट्रिक डेटामध्ये प्रवेश मिळतो व तो आपला सर्व डाटा सहज मिळवू शकतो. आपला आधार व पॅन क्रमांक बँकांशी जोडला आहे. त्यामुळे सावध राहा,’ असे घाबरवणारे संदेश व्हायरल होत आहेत. अशा मेसेजमुळे घाबरून जाण्याचे कारण नसले, तरी ते फॉरवर्ड न करण्याची काळजी घेण्याचे आवाहन सायबरतज्ज्ञांनी केले आहे.

‘सोशल मीडियावर असे मेसेज आले, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घेतली तर फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. आक्षेपार्ह अथवा संशयास्पद वाटणारे कोणतेही मेसेज आले, तर ते फॉरवर्ड करणे टाळले पाहिजे. आपला मोबाइल आपल्या हातात आहे, त्याचा वापर आपल्या सुरक्षेसाठी चांगल्या कामासाठीच करावा,’ असे आवाहन ठाण्यातील सायबर सेलमधील विधी तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link