Next
निवडक र. अ. नेलेकर
BOI
Thursday, June 06, 2019 | 10:17 AM
15 0 0
Share this article:

गूढ व भयकथा, कादंबऱ्या यांचे समृद्ध दालन मराठी साहित्यात आहे. या प्रकारच्या लेखनात कल्पनेचा कस लावावा लागतो. र. अ. नेलेकर यांमीही अशा प्रकारचे लेखन करून वेगळ्या प्रकारच्या कथा वाचकांसमोर ठेवल्या आहेत. त्यांच्या भयकथांमध्ये विविध विषय येतात. यातील काही कथा ‘निवडक र. अ. नेलेकर’ या पुस्तकात वाचायला मिळतात. मंग्याच्या टोळीला पकडून दिल्यानंतर तो आपल्या मागावर येईल, या भीतीने ग्रासलेल्या संज्याला घरातील कपाटामधील भुयार अवचित सापडते. तेथे मंग्याला अडकवून ठेवण्याच्या विचारात असलेल्या संज्याच्या खेळीचे वर्णन ‘कपाट उघडू नका’मध्ये केले आहे. बापूच्या पार्टीत पत्नी भाग्यश्रीला घेऊन आलेल्या उत्तमरावांची नियत तिला काळ दरीतील प्रसंगात कळते; पण पुढे अनपेक्षित घडते. सविता सदानंद भागवत ही सुस्वरूप युवती आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे डिटेक्टिव्हची मदत घेते. तोही तिला न्याय मिळवून देतो. याच्या अखेरीला मात्र दोघांनाही त्यांची वेगळी रूपे समजतात. अशा विविध विषयांवरील रहस्य-भय-गूढ आदी प्रकारच्या कथा या पुस्तकात वाचायला मिळतात.

पुस्तक : निवडक र. अ. नेलेकर
लेखक : र. अ. नेलेकर
प्रकाशन : राजेंद्र प्रकाशन
पृष्ठे : २६८
मूल्य : ३०० रुपये

(‘निवडक र. अ. नेलेकर’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search