Next
दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 12:49 PM
15 0 0
Share this story


निगडी (पुणे) : ‘नाट्य संस्कार कला अकादमी’ आयोजित ‘दिवाकर स्मृती नाट्यछटा’ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यंदाच्या हिंदी आणि इंग्रजी विभागातील स्पर्धेत पिंपरी चिंचवड विभागातून १२१हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

निगडीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनमध्ये या स्पर्धा आणि बक्षीस समारंभ पार पडला. डॉ. विनय हुईलगोळकर व ‘नाट्यसंस्कार’च्या विश्वस्त संध्या कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या वेळी स्पर्धाप्रमुख माधुरी ओक, अनुराधा कुलकर्णी उपस्थित होत्या. उज्ज्वला केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. परीक्षक म्हणून माधुरी गुळवेलकर, अब्दुल नबी शेख, मुग्धा वडके, दीपा परांजपे यांनी काम पाहिले. 

नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे यंदाच्या वर्षापासून हिंदीतील नाट्यछटा स्पर्धा म्हणजेच ‘दिवाकर स्मृती नाट्यछटा प्रतियोगिता’ आणि इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी ‘Diwakar Memorial Monologue Competition’ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

‘इंग्रजी आणि हिंदी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थांना नाटक आणि नाट्यछटांमध्ये गोडी निर्माण व्हावी, यासाठी या भाषांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात आल्याचे,’ नाट्यसंस्कार कला अकदामीच्या विश्वस्त संध्या कुलकर्णी यांनी सांगितले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
हिंदी नाट्यछटा :
शिशु गट : प्रथम नभा कुलकर्णी, द्वितीय आरव लाटे, उत्तेजनार्थ अरिषा कुंभार
पहिली / दुसरी गट : उत्तेजनार्थ विश्वम हरगुडे/यज्ञेश सोनगिरे 
तिसरी / चौथी गट : प्रथम अभिव्यक्ती मदने, द्वितीय शर्वरी भोंगळे, तृतीय सई शिरसकर, उत्तेजनार्थ प्राची संघवी 
पाचवी / सहावी गट : प्रथम ईश्वरी वडवेकर, द्वितीय रचिता चौगुले, उत्तेजनार्थ ईशा देवधर 
सातवी / आठवी गट :  प्रथम नक्षत्रा रासकर, द्वितीय सानिका नर्के 
लेखन विभाग :  पालक शालिनी बडोलिया, शिक्षक जीत कौर सोधी,  उत्तेजनार्थ  रेश्मा चव्हाण
 
इंग्रजी नाट्यछटा :
लहान गट : प्रथम  अरिशा कुंभार, द्वितीय  निधी चौरे, तृतीय अरुंधती सुरवडे, उत्तेजनार्थ आकांक्षा रेड्डी व अनुलेखा नम्बियार 
पहिली / दुसरी गट : प्रथम अन्वी बेलसरे,  उत्तेजनार्थ आंचल कुंभार, 
तिसरी / चौथी गट : प्रथम ईशान्या राहुरकर, द्वितीय सान्वी भाके 
पाचवी / सहावी : प्रथम वैष्णवी गटकुळ, 
सातवी / आठवी : प्रथम सानिका नरके, द्वितीय अक्षया तनपुरे 
लेखन विभाग : शिक्षक दीपाली तनपुरे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link