Next
‘उबर इंडिया’तर्फे ‘बढते चले’ अभियान
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 03:36 PM
15 0 0
Share this story

मुंबई : उबर या जगभरातील शहरी वाहतुकीची व्याख्या नव्याने करणाऱ्या राइडशेअरिंग अॅपने त्यांचे नवीन ब्रॅंड  पोझिशनिंग सर्वांसमोर आणले असून, विराट कोहलीला ब्रॅंड अॅम्बॅसडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ‘बढते चले’ ही आधाररेखा ब्रॅंडच्या नवीन पोझिशनिंगभोवती गुंफण्यात आली आहे.

उबर इंडियाचे मार्केटिंग प्रमुख संजय गुप्ता म्हणाले, ‘उबर दर आठवड्याला भारतातील लक्षावधी लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवते. याचा अर्थ, प्रत्येक ट्रिप हा केवळ भौतिक प्रवास नसतो, तर त्यांच्या आयुष्यातील मोठ्या प्रवासादरम्यान टाकलेले ते एक पाऊल असते. ही केवळ ब्रॅंडची कल्पना नव्हे, तर हे भारतभर दररोज प्रत्यक्षात हे घडत आहे. ही ब्रॅंड पोझिशन मूलत: मानवी आहे, कारण, लक्षावधी लोक दर आठवड्याला आमच्यासोबत प्रवास करतात आणि त्यांच्या उद्दिष्टांचाही पाठलाग करतात.’

‘या संवादाची रचना सर्वांना आपल्याशी निगडित वाटेल अशा पद्धतीने प्रगतीशील विचार आणि महत्त्वाकांक्षी चेतनेकडे जाण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे आणि वैयक्तिक प्रगतीचा भारतातील कदाचित सर्वांत प्रेरणादायी आदर्श ठरू शकेल अशा विराट कोहलीमध्ये उबरला प्रत्यक्ष खेळपट्टीवरील एक सहयोगी सापडला आहे, जो आम्ही भारतभरातील लक्षावधींसोबत शेअर करत असलेल्या प्रेरक शक्तीचे प्रतीक आहे. या संकल्पनेभोवती गुंफलेली एटीएल, डिजिटल आणि खासगी माध्यमांतील व्यापक प्रसिद्धी आमचे पोझिशनिंग भक्कम करेल आणि ते प्रत्यक्षातही आणेल,’ असे गुप्ता यांनी सांगितले.  

या अभियानात ‘उबर’ची कहाणी भारतात सांगण्यासाठी विराट ब्रॅंडचा आवाज म्हणून काम करणार आहे. पार्श्वभूमीला विराटचे कथन असलेल्या या जाहिरातीमध्ये ‘उबर’ वापरणाऱ्या चार प्रेरीत प्रवाशांची खरी उदाहरणे विविध संदर्भांत दाखवण्यात येतील आणि त्यायोगे त्यांच्या प्रवासाला नेमका हेतू कसा मिळाला हे सांगण्यात येईल. या जाहिरातीमध्ये एक अंध प्रवासी, बाळाच्या प्रतिक्षेत असलेले व घाईने रुग्णालयाकडे निघालेले एक जोडपे, कामासाठी प्रवास करणारी स्त्री डॉक्टर आणि मुलीला पहाटे ज्युडो क्लासला घेऊन जाणारी एक स्वतंत्र आई अशी चार उदाहरणे दाखवण्यात आली आहेत.

या प्रसंगी ‘उबर’चा ब्रॅंड अँबॅसडर विराट कोहली म्हणाला, ‘उबरच्या या अभियानात सहभागी होण्याबद्दल आणि मुख्य म्हणजे कंपनीसोबत केलेल्या सहयोगाने मी रोमांचित झालेलो आहे. कारण ही कंपनी आपल्या संपूर्ण क्षमतेनिशी शहरांना व त्यातील लोकांना सक्षम करण्याचे काम करत आहे. कोणत्याही वेळी, कुठेही आरामात प्रवास करण्यासाठी ‘उबर’ प्रवाशांना देत असलेल्या सेवेचे मला कौतुक वाटते. या अभियानाचा भाग झाल्यामुळे मला सहयोगी चालकांशी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधण्याची आणि कंपनीने त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात कशी मदत केली ते जाणून घेण्याची संधी मिळाली.’

या अभियानाची संकल्पना ऑगिल्व्ही आणि माथरची असून, भारतातील लाखो प्रवासी आणि चालकांसाठी ‘उबर’ हा महत्त्वाकांक्षेचे प्रतीक असलेला ब्रॅंड करण्याच्या प्रयत्नाचा पुनरुच्चार यात आहे. स्थळ अ ते स्थळ ब अशी वाहतूक करण्याच्या पलीकडे काहीतरी करणारा ब्रॅंडण्ड म्हणून ‘उबर’चे स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून, भारतातील हजारो सहयोगी चालकांना आणि प्रवाशांना विविध संधी मिळवून देण्याची उबरची भूमिकाही यात पुन्हा एकदा मांडण्यात आली आहे.

या मोहिमेबद्दल ऑग्लिव्हीच्या ग्रुप चिफ क्रिएटिव्ह ऑफिसर आणि उपाध्यक्ष सोनल डबराल म्हणाल्या, ‘निव्वळ एखादे उत्पादन किंवा सेवा विकण्याच्याही पलीकडे जात जीवनविषयक एक तात्विक मांडणी करणारे काम नेहमीच उत्साहवर्धक वाटते. एक लक्ष्य समोर ठेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याचा ‘उबर’चा संदेश प्रत्यक्षात आणणे हे कामच आमच्यासाठी एक जिद्द बनली होती. या एकात्मिक मोहिमेत परस्परसंबंधी फिल्म्स आहेत. यातील चार लढवय्या व्यक्तिमत्त्वांनी चार स्वतंत्र फिल्मच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील त्यांच्या चार वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत आणि त्यांना साथ लाभली आहे विराट कोहलीची. यातून एक सकस आणि गुंतवून ठेवणारी कथा जन्माला आली आहे. आम्हाला या निर्मितीत जितका आनंद मिळाला तितकाच आनंद हे काम पाहणाऱ्या प्रत्येकाला मिळेल, अशी आशा आहे आणि मला नक्कीच आशा वाटते की, यापुढे त्यांचा प्रत्येक प्रवास, लहान असो की मोठा, एक प्रेरणात्मक आशेचा किरण घेऊन येईल. त्यात आमचा मूळ विचार ‘बढते चले’ त्यांच्यासोबत असेल.’

या अभियानासाठी माध्यम धोरण निश्चित करण्यासाठी आणि ते अंमलात आणण्यासाठी ‘उबर’ने २०१८ मध्येही मॅडिसनशी संबंध कायम ठेवले आहेत. सहा महिन्यांच्या बहुव्यासपीठ अभियानाची व्याप्ती एटीएल (टीव्ही, रेडिओ, ओओएच, मुद्रित माध्यमे), तसेच डिजिटल (यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि कंटेंट प्रकाशक), तसेच ‘उबर’च्या मालकीच्या सीआरएम वाहिन्या व ठिकाणे यांच्यापर्यंत असेल. या व्यवसायाने साध्य केलेली वाढ आणि भौगोलिक व्याप्ती बघता, टीव्हीसी आणि रेडिओवरील कार्यक्रम हिंदी, कन्नड, मराठी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा सहा भाषांत प्रसारित केले जातील.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link