Next
रत्नागिरीत ४० हजार जंगली बियाण्यांचे वाटप
BOI
Thursday, November 30 | 03:00 PM
15 0 0
Share this story

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना हरित मित्र परिवाराचे महेंद्र घागरे.रत्नागिरी : येथील सामाजिक वनीकरण विभागातर्फे घेण्यात आलेल्या योजनाविषयीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत पुणे येथील हरित मित्र परिवाराचे प्रमुख महेंद्र घागरे यांनी सुमारे ४० हजार जंगली वनस्पतींच्या बियाण्यांचे मोफत वाटप केले. आगामी दोन वर्षांत बीज पेरणीतून पाच कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घागरे यांनी या वेळी बोलून दाखवला.

रत्नागिरीतील विविध शाळा, हरित सेना, सामाजिक संस्था, मंडळे यांना वृक्ष लागवड उपक्रम आणि संगोपनासाठी आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन घागरे यांनी दिले. या वेळी येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी श्री. धुमाळ, ‘हरित मित्र’चे येथील जिल्हाध्यक्ष सिद्धेश धुळप यांसह सुमारे दोनशे शिक्षक उपस्थित होते.

जिल्ह्यात ‘निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ’ या संस्थेच्या माध्यमातून ‘हरित मित्र’च्या सहकार्याने मंडळाचे राज्य उपाध्यक्ष विलास महाडिक आणि मंडळाचे राज्य सचिव, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर राबवित असलेल्या विविध पर्यावरण संवर्धनविषयक उपक्रमांचे घागरे यांनी कौतुक केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link