Next
‘होंडा’ घडवणार जागतिक स्तरावरील भारतीय रायडर
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this article:


चेन्नई : ‘होंडा टू-व्हीलर्स इंडिया’तर्फे भारतातील टू-व्हीलर मोटरस्पोर्टमध्ये लक्षणीय बदल केले असून, असे करणारी ही भारतातील पहिली टू-व्हीलर उत्पादक कंपनी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. होंडा टू-व्हीलर्स इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनोरू कातो यांनी भारतीय टू-व्हीलर रेसिंगला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी रेसिंगच्या दुसऱ्या पर्वाचे सूतोवाच केले.  

कातो यांनी ‘होंडा’च्या २०१९ गेम-चेंजिंग मोटरस्पोर्ट नियोजन जाहीर केले असून, ब्रँड लीडरशिप व संरचनात्मक विकास या दोन विशिष्ट क्षेत्रांवर आक्रमकपणे भर दिला जाणार आहे. या विषयी बोलताना ते म्हणाले, ‘गेल्या दशकात या खेळाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे आता भारतातील मोटरस्पोर्ट ही ‘होंडा’ची ओळख झाली आहे. २०१८मध्ये, इंटरनॅशनल एशिया रोड रेसिंग चॅम्पिअनशिपमध्ये सोलो इंडियन टीम निर्माण करणारे आम्ही पहिले होतो. २०१९मध्ये, आम्ही पुढील पाऊल उचलत आहोत आणि जगातील सर्वोत्तम मोटरस्पोर्ट भारतात आणत आहोत. 'Moto3'चे वर्ल्ड चॅम्पिअन ज्या मशीनवर कामगिरी करतात त्याच मशीनवर आता भारतीय रायडर कामगिरी करणार आहेत, हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.’

‘ब्रँड लीडरशप व संरचनात्मक विकास या ‘होंडा’ने ठरवलेल्या उद्देशातून, भारतातील मोटरस्पोर्टमध्ये पुढाकार घेण्याचे व नेतृत्व करण्याचे आमचे उद्दिष्ट अधोरेखित होतेच, शिवाय भारतातून आयकॉनिक रायडर घडवण्याचे व जागतिक स्तरावर त्यांच्या जलद प्रगतीसाठी परिपूर्ण नियोजन करण्याची योजनाही स्पष्ट होते. जगामध्ये भारतातून भविष्यातील आयकॉनिक रायडर घडवणे, हे माझे स्वप्न आहे,’ असे कातो यांनी नमूद केले.


‘होंडा’च्या नियोजनाविषयी बोलताना ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’चे ब्रँड व कम्युनिकेशन्सचे उपाध्यक्ष प्रभू नागराज म्हणाले, ‘जगभर रेसिंगची सुरुवात अतिशय लहान वयात केली जाते. भारतातील ही समस्या सोडवण्यासाठी, आम्ही तरुण रायडर निवडण्यासाठी ‘इदेमित्सू होंडा इंडिया टॅलेंट हंट’ हे व्यासपीठ २०१८मध्ये व्यासपीठ सुरू केले. या तरुणांनी अगोदरच चुणुक दर्शवली आहे. पुढील पायरी म्हणून, ‘होंडा’ने आता ‘Moto3’ मशीन भारतात आणायचे ठरवले आहे. कोणत्याही उत्पादकाने घेतलेला हा पहिलावहिली व क्रांतीकारी निर्णय आहे. त्यामुळे भविष्यातील रेसर घडणार असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याचीही संधीही मिळणार आहे.’

इदेमित्सू ल्युब इंडियाचे उप व्यवस्थापकीय संचालक योशिताका शिरगा म्हणाले, ‘ऑटोमोटिव्ह व इंडस्ट्रीअल ल्युब्रिकंट यामध्ये १०० वर्षांहून अधिक अनुभव असणारी इदेमित्सू ल्युब इंडिया ही भारतासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या ल्युब्रिकंट्सची निर्मिती करते. मोटर रेसिंगमधील खोल पाळेमुळे विचारात घेता, ‘इदेमित्सू’ने दीर्घ काळापासून भारतातील ‘होंडा’ रेसिंगशी सहयोग केला आहे आणि भारतातील मोटरसायकलिस्टची गुणवत्ता व पॅशन यांना पाठिंबा देण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search