Next
भारतात ‘होम फर्निशिंग’ घेतेय लोकशाहीचे स्वरूप
प्रेस रिलीज
Saturday, December 22, 2018 | 11:15 AM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘होम फर्निशिंगचा निर्णय सर्वांनी एकत्रितपणे घ्यायला हवा आणि त्यामध्ये प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार असायला हवा, असे भारतातील २५ ते ३५ वर्षे वयोगटातील ५४.३ टक्के तरुणांना वाटते; परंतु, ‘होम फर्निशिंग डेमॉक्रसी’ बद्दलची ही बांधिलकी वयानुसार घटत जाते,’ असे मत गोदरेज इंटेरिओ या फर्निचर कंपनीने केलेल्या संशोधन अभ्यासामध्ये नोंदवण्यात आले आहे. इंटेरिओ इंडेक्समार्फत भारतीयांच्या होम फर्निशिंगच्या निवडीमागची निर्णय घेण्याची प्रक्रिया, तसेच त्यातून कुटुंबातील नात्यांविषयी व प्रभावाविषयी काय उलगडते, हे समजून घेण्यासाठी सर्व्हेक्षण केले जाते.

प्रतिसाद दिलेल्यांपैकी ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील ४७.६ टक्के जणांनी होम डेकॉरचा निर्णय एकत्रितपणे घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील ३९ टक्के जणांच्या मते आणि ५५ वर्षे किंवा त्याहून वरील वयोगटातील ३५.४ टक्के जणांच्या मते होम डेकॉरचा निर्णय एकत्रितपणे घेण्याचा निर्णय आहे.

या बाबत बोलताना गोदरेज इंटेरिओचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर म्हणाले, ‘इंटेरिओ इंडेक्सने एकत्रितपणे निर्णय घेण्याचा ट्रेंड अधोरेखित केला आहे आणि हा ट्रेंड प्रामुख्याने भारतातील तरुण पिढीमध्ये दिसून येतो. आमच्या निष्कर्षांनुसार, फर्निचरची पसंती व इंटिरिअर डिझाइनचा निर्णय एकत्रितपणे घ्यायला हवा आणि त्यामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घ्यायला हवे, असे तरुणांना वाटते.’

सर्व्हेक्षणातील माहितीनुसार, घरातील विविध खोल्यांबद्दल निर्णय घेत असताना कुटुंबातील सर्वांचे मत घेण्याचा ट्रेंड दिसून आला. बेडरूम फर्निशिंगचा निर्णय संयुक्तपणे घ्यायला हवा, हे मत ५५ वर्षांवरील केवळ २१.१ टक्के लोकांनी व्यक्त केले. हाच ट्रेंड किचन डेकॉरच्या बाबतीतही दिसून आला. हा निर्णय एकत्रितपणे घ्यायला हवा, असे २३.६ टक्के तरुणांना वाटते, तर ५५ वर्षांवरील केवळ १५.३ टक्के जणांना असे वाटते. लिव्हिंग रूममधील फर्निशिंगचे निर्णयही अशाच पद्धतीने घेतले जातात व कुटुंबातील लोकशाही पद्धतीमुळे कुटुंबातील व्यक्तींना वैयक्तिक निर्णय घेण्याची मुभा दिली जाते.  

खोल्यांचा विचार करता, भारतातील वयस्क पिढी एकपक्षी दृष्टिकोनाला प्राधान्य देते. लिव्हिंग रूमच्या बाबतीत उदाहरण घ्यायचे झाले, तर ३५ वर्षांवरील ४८.१ टक्के जणांना डिझाइनसंदर्भात कुटुंबातील पतीने किंवा पत्नीने अंतिम निर्णय घ्यावा, असे वाटते. या तुलनेत तरुण पिढीतील केवळ ३९.७ टक्के जणांना असे वाटते. हा ट्रेंड बेडरूमच्या बाबतीतही दिसून येत असून, त्यामध्ये ३५ वर्षांवरील ५४.९ टक्के जणांच्या मते डेकॉरचा अंतिम निर्णय पतीचा किंवा पत्नीचा असतो, तर तरुणांमध्ये हे प्रमाण ४८.५ टक्के आहे.

भारतातील बहुतांश कुटुंबासाठी, होम फर्निशिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विवाह हे मोक्याचे निमित्त असते. हा उपक्रम म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा विषय असतो आणि त्यासाठीची निर्णयप्रक्रिया एकत्रितपणे करायची असते. भारतातील घराघरात होम फर्निशिंग खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीचे स्वरूप घेत आहे, हे यातून दिसून आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link