Next
ऑस्ट्रेलियातील अंतराळ परिषदेत नाशिकची देवयानी
मंगळ ग्रहासंदर्भातील निबंध सादर करणार
BOI
Monday, September 17, 2018 | 02:40 PM
15 0 1
Share this story

देवयानी गुजर

नाशिक :
२४ ते २६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार असलेल्या १८व्या अंतराळ संशोधनविषयक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मूळची नाशिक येथील असलेली देवयानी गुजर हिची निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियन स्पेस रिसर्च कॉन्फरन्स असे या परिषदेचे नाव असून, ती क्वीन्सलँड राज्याच्या गोल्ड कोस्ट या किनारपट्टीवरील शहरात होणार आहे. 

इंटरनॅशनल एरोस्पेस सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया, नॅशनल कमिटी फॉर स्पेस अँड रेडिओ सायन्स, मार्स सोसायटी ऑफ ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारे जगभरात नामवंत संशोधक त्यात सहभागी होणार असून, देवयानीचीही त्यात निवड झाली आहे. मंगळावर जाणाऱ्या उपग्रहासाठी लागणारे इंधन, पाणी अवकाशातून कसे निर्माण करता येईल, त्यामुळे उपग्रहासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत कशी करता येईल, उपग्रहाचे वजन कमी करून खर्च कमी कसा करता येईल, अवकाशातील प्रदूषण कसे कमी करता येईल, आदी मुद्द्यांवरील संशोधन निबंध देवयानी या परिषदेत मांडणार आहे. तिला ‘आयआयटी चेन्नई’मधील प्रोजेक्ट ऑफिसर विक्रम रामानन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

सिन्नर येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयातून दहावी झालेली देवयानी गुजर सिन्नर महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी झाली. पुढे अंतराळ संशोधन क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी ती चेन्नईत पोहोचली. एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे ती आता ऑस्ट्रेलियातील परिषदेत सहभागी होणार आहे. तिच्या यशाबद्दल नाशिककरांकडून तिचे कौतुक होत असून, तिचा ठिकठिकाणी सत्कारही केला जात आहे.

आणखी एक महाराष्ट्रीय
दरम्यान, या परिषदेसाठी आणखी एका भारतीयाचीही निवड झाली असून, तेही महाराष्ट्रातीलच आहेत. सांगलीतील पलूस येथील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील सुभाष दादाजी पवार यांचीही या परिषदेसाठी निवड झाली आहे. रामानंदनगर येथील ग्रामीण केंद्राच्या परिसरातील हवेतील आयन्समधील सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत होणारे बदल या विषयावर ते पोस्टर सादर करणार आहेत. 

(या परिषदेविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 1
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravi Nath About 151 Days ago
Please contact regarding Sanitary Napkin disposal system.
0
0

Select Language
Share Link