Next
मुंबईत डीएलएआय फिनटेक परिषदेचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, May 02 | 04:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : डिजिटल लेंडर असोसिएशन ऑफ इंडिया (डीएलएआय) द्वारे मुंबईत तीन मे, रोजी डीएलएआय फिनटेक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. फिनटेक क्षेत्राशी संबंधित ज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी ही परिषद भारतातील उदयोन्मुख फिनटेक इकोसिस्टमच्या प्रमुख भागधारकांना एकत्र आणणार आहे. 

या कार्यक्रमाचा उद्देश या क्षेत्रातील विचारवंत, बँकर्स, फिनटेक कंपन्या, उद्यम भांडवलदार, सरकारी प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि स्टार्ट-अप यांना एकत्र आणत भारतातील फिनटेक संबंधीची त्यांची दृष्टी आणि भविष्यातील वाटचाल यांचा परस्पर समन्वय शोधण्याकरिता मंच प्रदान करण्याचा आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि यूपीआय २.० आणि ई-मँडेटवर सेशन्स आणि दोन कार्यशाळाही या वेळी होणार आहेत.

या परिषदेत इक्विटी फायनान्सिंग, वैकल्पिक कर्जदारांसाठी कर्ज भांडवल आणि डेटा गोपनीयता या प्रमुख विषयांवर पॅनलमध्ये या क्षेत्रातील मान्यवरांद्वारे प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे;तसेच परिषदेत प्रथमच स्टार्टअप पिचचे आयोजन करण्यात आले असून, यातून निवडण्यात येणाऱ्या पाच स्टार्टअप्सना आपली संकल्पना उपस्थित गुंतवणूकदारांसमोर मांडून व्यावसायिक निधी उभारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

याबाबत माहिती देताना डीएलएआयचे प्रवक्ते म्हणाले, ‘या कार्यक्रमात अनेक उत्तेजक कार्यक्रम, चर्चा आणि कार्यशाळांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाईल. फिनटेक उद्योगासाठी विशेषत: तांत्रिक नवकल्पनांच्या बाबतीत आणि अधिक आर्थिकदृष्ट्या-समावेशक समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारचा पाठिंबा असलेल्या क्षेत्रांसाठी ही एक चांगली संधी आहे. हा कार्यक्रम पुन्हा एकदा उद्योगातील भविष्याबद्दल संवाद साधण्यासाठी फिनटेक डोमेनमधील अनेक प्रमुख भागधारकांना एकत्र आणण्यासाठी सज्ज झाला आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link