Next
शरद पवार यांच्या २१ जूनपासून जिल्हानिहाय बैठका
प्रेस रिलीज
Thursday, June 20, 2019 | 05:49 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे २१ जूनपासून प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी सलग चार दिवस काही जिल्ह्यांत मॅरेथॉन बैठक घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण माहिती घेतली होती. आता २१ जूनपासून पुन्हा बैठकांना सुरुवात होणार आहे.

उद्या (२१ जून) सकाळी १० वाजता अकोला शहर, ग्रामीण, बुलढाणा, वाशीम, अमरावती शहर, ग्रामीण, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर शहर, ग्रामीण, भंडारा गोंदिया, २३ जूनला सकाळी १० वाजता औरंगाबाद शहर, ग्रामीण, परभणी शहर, ग्रामीण, जालना, हिंगोली, बीड, नांदेड शहर, ग्रामीण, लातूर शहर, ग्रामीण, उस्मानाबाद, वर्धा आदी ठिकाणी ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

या बैठकांना शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते, आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेश सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search