Next
पवन सिंग ‘आरटीएस’ परीक्षकांच्या अध्यक्षपदी
प्रेस रिलीज
Thursday, May 24 | 04:31 PM
15 0 0
Share this story

पुणे : इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे (आयएसएसएफ) म्युनिच येथे होणाऱ्या आयएसएसएफ रायफल-पिस्टल विश्वचषक स्पर्धेसाठी पुण्याच्या माजी नेमबाज आणि भारतीय नेमबाजी संघाचे माजी प्रशिक्षक पवन सिंग यांची रिझल्ट टाइमिंग स्कोअर (आरटीएस) परीक्षकांच्या (ज्युरी) अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

पुण्यात मुख्यालय असलेल्या गन फॉर ग्लोरी अॅकॅडमीचे सहसंस्थापक आणि भारतीय राष्ट्रीय राइफल महासंघाचे (एनआरएआई) संयुक्त महासचिव असलेले सिंग या नेमणुकीमुळे वरिष्ठ विश्वचषक स्पर्धेत ‘आरटीएस’ परीक्षकांच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. ‘आरटीएस’ परीक्षकांचे अध्यक्ष या मानाच्या पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीकडे प्रशासकीय कामकाजाचे पालन करणे, परीक्षक सदस्यांशी समन्वय साधणे, याबरोबरच स्पर्धात्मक मोकळेपणाचा सन्मान करण्यासाठी कोणत्याही विसंगतीशिवाय तांत्रिक संचालकांना अहवाल देणे आदी महत्त्वाची कामे असतात.

भारताकडे यजमानपद असलेली नवी दिल्ली येथील २०१९ची विश्वचषक स्पर्धा आणि २०२०मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या दृष्टीने सिंग यांची ही निवड महत्त्वाची ठरणार आहे. सिंग यांनी यापूर्वी ‘आयएसएसएफ’तर्फे २०१७मध्ये आयोजित जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे.

‘आरटीएस’ परीक्षकांचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना सिंग म्हणाले, ‘स्पर्धेतील निकाल देणे, गुणांशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे, याबरोबरच पुढील प्रक्रियेसाठी निकालाची वेळेवर माहिती देणे आदीची महत्त्वाची जबाबदारी अध्यक्षाकडे असते. नेमबाजांचे गुण आणि पदकांवर अध्यक्षाची भूमिका थेट परिणाम करते, त्यामुळे हे पद खूपच महत्वाचे आहे.’

‘यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धांमधील उपकरण नियंत्रण व्यवस्थापक, वर्ल्डकपमधील अंतिम फेरी व्यवस्थापक आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांची जबाबदारी मी सांभाळली आहे. म्हणूनच या भूमिकेचे गांभीर्य आणि महत्त्व मला माहीत असून, ही जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करीन,’ असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link