Next
‘वीर सेवा दला’तर्फे बालोद्यान संस्थेला मदत
प्रेस रिलीज
Tuesday, November 14 | 04:35 PM
15 0 0
Share this story

वीर सेवा दल, कोरोची शाखेतर्फे बालोद्यान संस्थेला चादरी भेट देण्यात आल्या. या वेळी जिल्हा सचिव विजय बरगाले, महेश चौगुले यांच्यासह बालोद्यानचे संजय खूळ, राजेंद्र जगदेव, अमित काकडे आदी उपस्थित होते.
कोरोची : येथील वीर सेवा दल शाखेला ३५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अब्दुल लाट येथील 'बालोद्यान' संस्थेला ५० चादरी भेट देण्यात आल्या. कुलभूषण बिरनाळे यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी विकास प्रबोधिनी संस्थेतर्फे अनाथ, भटक्या व वंचित मुलांसाठी 'बालोद्यान' हे निवासी वसतिगृह चालविले जाते. येथील मुलांसाठी या चादरी देण्यात आल्या. 

या वेळी या संस्थेच्या समुपदेशन सल्लागार समितीचे अध्यक्ष संजय खूळ, राजेंद्र जगदेव, अमित काकडे यांच्यासह वीर सेवा दलाचे जिल्हा सचिव विजय बरगाले, तालुका सदस्य शीतल पाटील, संघनायक स्वप्निल उपाध्ये, संचालक सुरेश कारदगे, जनसंपर्क अधिकारी अर्चना बनगे,उपसंघनायक सौरभ पाटील. बाहुबली उपाध्ये, जितेंद्र चौगुले, वीरेंद्र कुरुंदवाडे, बाहुबली पाटील, राजगोंडा पाटील, महावीर उपाध्ये, महेश चौगुले, शशिकांत पाटील, अभिजित बरगाले, विपुल पाटील,  सुभाष खुरपे आदी उपस्थित होते.

'बालोद्यान'च्या व्यवस्थापिका निर्मला कोठे यांनी सर्वांचे स्वागत केले. संजय खूळ यांनी संस्थेविषयी माहिती दिली. महेश चौगुले, विजय बरगाले यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीनी गौरी काळे हिने आभार मानले.

वीर सेवा दल कोरोची शाखेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. पांजरपोळ अभियान, वृक्षारोपण, पूजा सेवा, ओढा स्वच्छता, वेबसाईट निर्मिती, रक्तदान शिबीर, शैक्षणिक मदत, विविध स्पर्धा, रोबोटिक कार्यशाळा, आरोग्य शिबिरे, व्याख्यानमाला, युवती सक्षमीकरण, पाठशाला संस्कार, पुरग्रस्तांना धान्य वाटप, दुष्काळग्रस्तांना मदत, जवानांचा सत्कार असे अनेक उपक्रम राबविले आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link