Next
बाळासाहेब तोरस्कर साहित्य रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित
BOI
Tuesday, March 19, 2019 | 05:25 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : येथील जेष्ठ कवी, लेखक व पत्रकार बाळासाहेब तोरस्कर यांना या वर्षीच्या कर्नाटक राज्यस्तरीय आदर्श साहित्य रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कितूर राणी चन्नमा यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिसेस इंडिया कोल्हापूर शुभांगी शिंत्रे यांच्या हस्ते व पत्रकार अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बेडकिहाळ येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवात प्रदान करण्यात आला.

या वेळी मिसेस इंडिया बेळगाव अश्वगंधा कुगजी, अभिनेत्री पद्मजा खटावकर, ठाण्यातील समाजसेविका सुनिता काटकर, डी. एस. डोणे, पत्रकार अशोक काकतीकर , आयोजक विक्रम शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. बेडकिहाळ (जि. बेळगाव) येथील बसवंत शिंगाडे सामाजिक संस्था व कितूर राणी चन्नमा सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे डी. एस. कॉलेजच्या रत्नाप्पाना कुभार हॉलमध्ये हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तोरस्कर यांचे साहित्यिक क्षेत्रातील विविधांगी कार्याची दाखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आहे.
 
तोरस्कर हे काव्यप्रेमी शिक्षक मंचचे मुंबई जिल्हाध्यक्ष आणि ठाणे येथील ‘नक्षत्राचं देणं काव्यमंच’चे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचे ‘प्रीतफुले’ व ‘वाळवंटातील झरे’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून, त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यासाठी त्यांचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
बाळासाहेब तोरस्कर About 98 Days ago
Thanks lot Nice News
0
0

Select Language
Share Link
 
Search