Next
सिद्धार्थ फाउंडेशनतर्फे शालेय साहित्याचे वाटप
मिलिंद जाधव
Friday, July 12, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this article:

शहापूर : सिद्धार्थ फाउंडेशन या संस्थेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत ‘एक वही एक पेन’ अभियान  राबविले होते. या अभियानांतर्गत मिळालेल्या वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाट्या या शालेय साहित्याचे वाटप वासिंद (जिजामाता नगर) येथील रायकरपाडा जिल्हा परिषद शाळेत आठ जुलैला करण्यात आले.

छत्रपती शिवराय, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी वासिंद ग्रामपंचायतीच्या सरपंच लता शिंगवे, उपसरपंच हेमलता कंठे, संस्थेचे अध्यक्ष वसंत धनगर, पंच्यात समिती सदस्या संजीवनी कोचुरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष वसंत धनगर यांनी भूषविले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी केले. शहापूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात रायकरपाडा, गोंधळीपाडा, मोहपाडा, शिंगेपाडा, कातबाव आदी जिल्हा परिषद शाळेतील १५० गरजू विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. 

या केंद्रप्रमुख पांडुरंग शिर्के, भारतीय बौद्ध महासभेच्या वासिंद येथील अध्यक्षा भारती सोष्टे, उद्योगपती अशोक ठाणगे, के. के. संगारे, जयश्री शेवाळे, सरचिटणीस अशोक गायकवाड, उपाध्यक्ष मच्छिंद्र साळवे, वधू-वर सूचक केंद्राचे प्रमुख प्रकाश कांबळे, खजिनदार डॉ. रत्नदीप शिवगण, संचालक बळीराम गायकवाड, गुरुनाथ गायकवाड, शिवराम चन्ने, सदस्य सिद्धार्थ साळवे, संदीप गायकवाड उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य सिद्धार्थ साळवे यांनी केले. आभार धनगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व संचालक व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search