Next
‘पेटीएम बँके’ला नवीन ग्राहक स्वीकृतीसाठी ‘आरबीआय’ची मान्यता
प्रेस रिलीज
Thursday, January 03, 2019 | 01:58 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारताची सर्वात मोठी डिजिटल बँक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) ३१ डिसेंबर २०१८ पासून बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी केवायसी सुरू ठेऊन नवीन ग्राहक स्वीकारण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संभाव्य ग्राहकांना आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडता येणार आहे.

पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडने वरिष्ठ बँकर सतीश गुप्ता यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गुप्ता यांच्या पाठीशी तब्बल तीन दशकांपेक्षा जास्त बँकिंग आणि पेमेंट्स प्रणालीचा अनुभव असून, यापूर्वी ते एसबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाशी निगडीत होते. आपल्या व्हिजनला अनुसरून २०१९ अखेरपर्यंत आणखी १०० दशलक्ष ग्राहक मिळवण्याचे या बँकेचे ध्येय आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता म्हणाले, ‘पेटीएम पेमेंट्स बँक प्रत्येक भारतीयापर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्याच्या मिशनवर आहे. डिजिटलचा स्वीकार करण्यात मदत करणे आणि जास्तीत जास्त लोकांना डिजिटल व्यवहारांची समज देणे हे त्यांचे व्हिजन आहे. आमचा विश्वास आहे की, यामुळे आपली अर्थव्यवस्था औपचारिक होण्यास आणि आर्थिक समावेशकता वाढवण्यास मदत होईल.’

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना मोफत बँकिंग सेवेसह बचतीवर वार्षिक चार टक्के व्याज दिले जाते. पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडकडे एक अत्यंत सशक्त आणि सुरक्षित टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर असून ही बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात एक लाख रुपयापर्यंत जमा करण्याची अनुमती देते. बँक खात्याच्या इतर वैशिष्ट्यांत व्हर्चुअल पासबुक, डिजिटल आणि प्रत्यक्ष डेबिट कार्ड आदींचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link