Next
आईच्या दशक्रिया विधीआधी मतदान!
सरपोतदार कुटुंबीयांचे राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य
BOI
Tuesday, April 23, 2019 | 02:04 PM
15 0 0
Share this article:

विवेक आणि योगेश सरपोतदार

पुणे : मतदानाच्या दिवशीच आईचा दशक्रिया विधी असतानादेखील विवेक आणि योगेश सरपोतदार यांनी आपल्या वडिलांसह मतदानाचे कर्तव्य पार पाडले. दशक्रिया विधीसाठी जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मतदार केंद्रात हजेरी लावून मतदान केले. 

‘आईच्या मृत्यूचे दुःख आहेच ;पण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आणि हक्क असल्याने तो प्रत्येकाने बजावला पाहिजे,’ या भूमिकेतून आपण या परिस्थितीतदेखील मतदानासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. ‘आम्ही या दिवशीही मतदानासाठी येऊ शकतो, तर बाकीचे का नाही,’ असा सवाल करून त्यांनी मतदारांना मतदानासाठी येण्याचे आवाहन केले. 

योगेश आणि विवेक सरपोतदार यांच्या मातोश्री विनया सरपोतदार यांचे १४ एप्रिल रोजी निधन झाले. आज, मंगळवारी (२३ एप्रिल २०१९) त्यांचा दशक्रिया विधी होता; पण त्यापूर्वी या दोघांनी आपल्या वडिलांसह मतदानासाठी हजेरी लावली. विवेक सरपोतदार म्हणाले, ‘आमची आई आजारी असली, तरी मतदानाला न चुकता यायची. आतापर्यंत आम्ही चौघेही मतदानासाठी एकत्र जायचो. हे आपले प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते बजावलेच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आज आम्ही आधी मतदान करून मग दशक्रिया विधीसाठी जाणार आहोत. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे; तेव्हा घरी न बसता, मतदान करा, असे आमचे प्रत्येक मतदाराला आवाहन आहे.’ 

योगेश सरपोतदार म्हणाले, ‘आई गेल्याचे दुःख खूप मोठे आहे; पण मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, त्यामुळे दुःख बाजूला ठेवून आम्ही मतदानासाठी आलो आहोत.’

एवढे मोठे दुःख उराशी बाळगून मतदानासाठी आलेल्या या मुलांची कर्तव्यनिष्ठा मतदान न करता घरी बसणाऱ्या मतदारांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. 

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search