Next
महाशिवरात्रीसाठी सोनू निगमची दोन नवीन गाणी
BOI
Tuesday, March 05, 2019 | 01:11 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : बॉलीवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम दोन अध्यात्मिक गाणी घेऊन आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोनूने भगवान शंकर यांच्यावरची ‘शिव शंकरा..’ आणि ‘बम भोले बम..’ ही दोन गाणी रेकॉर्ड केली असून महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने ती सादर केली आहेत. शंकराची मोठी भक्त असलेल्या आपल्या आईला त्याने ही गाणी अर्पण केली आहेत. 

चित्रपटांमधील कैक हिट गाण्यांबरोबरच ‘दिवाना’सारख्या अनेक अल्बममधील गाण्यांमुळे सोनू निगमने चाहत्यांच्या मनात आपली एक विशिष्ट जागा निर्माण केली आहे. त्याच्या ‘दिवाना’ या अल्बममधील गाणी आजही सगळीकडे ऐकली जातात. असा सगळ्यांचा लाडका सोनू गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये फार नसल्याने त्याला ऐकणे दूर्मीळ झाले होते. अशातच त्याने महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकरांवर केलेली दोन गाणी त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली आहेत. 

‘माझी आई शंकराची खूप मोठी भक्त आहे, त्यामुळे भगवान शंकरासाठी केलेली ही दोन्ही गाणी माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. ही दोन्हीं गाणी मी माझ्या आईला अर्पण करत आहे’, असे सोनू निगमने सांगितले. नेपाळमधील ‘सी. जी. एन्टरटेनमेंट’ची निर्मिती असलेली ही गाणी ‘टाईम्स म्युझिक’ने प्रकाशित केली आहेत. कवी वसंत चौधरी यांनी ही गाणी लिहिलेली असून श्रेयस पुराणिक यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे. 

या गाण्यांबाबत बोलताना श्रेयस पुराणिक यांनी सोनूचे खूप कौतुक केले. ‘सोनू निगम यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. आजवर मी अध्यात्मिक गाण्यांमध्ये गणपतीची गाणी केली आहेत. परंतु भगवान शंकर यांच्यावरील गाणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे’, असे त्यांनी सांगितले. 

वसंत चौधरी यांनीही हा अनुभव खूप छान असल्याचे सांगितले. ‘काठमांडूमधील रहिवासी असल्याकारणाने याठिकाणी प्रचलित असलेल्या पशूपतिनाथ भगवान यांच्या प्रेरणेने अगदी सहज आणि नैसर्गिकरीत्या ही गाणी लिहिली गेली. ‘शिव शंकरा’ आणि ‘बम भोले बम’ ही दोन्हीही गाणी ऐकण्याबरोबर पाहण्यासाठीही खूप छान आहेत. हिमालयातील एका सुंदर ठिकाणी त्यांचे शुटिंग करण्यात आले आहे’, असे वसंत चौधरी यांनी सांगितले.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search