Next
‘रुबी हॉल’मध्ये अल्ट्रासोनिक इमेजिंग उपकरण
प्रेस रिलीज
Friday, January 11, 2019 | 02:37 PM
15 0 0
Share this article:पुणे : रुबी हॉल क्लिनिकमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांसाठी पुण्यात पहिले अल्ट्रासोनिक इमेजिंग उपकरण आता उपलब्ध झाले आहे. ‘हिताची अलोका अरीअट्टा एस ६०’ हे रोबोटद्वारा नियंत्रित अल्ट्रासोनिक इमेजिंग उपकरण असून, भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यातर्फे देणगी स्वरूपात देण्यात आले.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, मुख्य कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी, ग्रांट मेडिकल फाउंडेशनचे विश्‍वस्त व अध्यक्ष डॉ. परवेझ ग्रांट, रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, चीफ रोबोटिक सर्जन डॉ. हिमेश गांधी, लॅबोरेटरी इन्फेक्शन कंट्रोल व क्वालिटी विभागाच्या संचालिका डॉ. नीता मुन्शी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. हिमेश गांधी यांनी उपस्थितांना या मशीनचा शल्यविशारद व रुग्णांना असलेल्या फायद्यांविषयी माहिती दिली.

पुण्यातील पहिले रोबोटिक सेंटर म्हणून रोबोटिक शल्यविशारदांच्या याबाबत असलेल्या गरजांची जाण हॉस्पिटलला आहे. अल्ट्रा साउंड उपकरणामुळे रुग्णसेवेमध्ये आमुलाग्र सुधारणा होण्याचे सामर्थ्य आहे. ‘हिताची अलोका अरीअट्टा एस ६०’मध्ये उत्कृष्ट अल्ट्रा साउंड तंत्रज्ञान असून, सर्वकांश रिअल टाइम अल्ट्रा साउंड इमेजिंग करण्यासाठी यामध्ये विशेष साधने आहेत. यामुळे उतींमधला फरक स्पष्टपणे दिसतो व फ्रेमरेट राखत कमी आवाज होतो. हे शल्यविशारदांना शरीररचनेचे उच्च रिझोल्युशन प्रतिमा दाखविते. वापरण्यास सोयीस्कर व टिकाऊपणामुळे हे तंत्रज्ञान जगभर वापरले जात आहे.

या प्रसंगी बोलताना डॉ. गांधी म्हणाले, ‘या उपकरणामुळे रिअल टाइम इमेजिंगद्वारे मौल्यवान माहिती मिळते, ज्याची मदत शस्त्रक्रियेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी होते. मुत्रपिंडाच्या कर्करोगांवर रोबोटिक उपचारांचे हे नवे पर्व आहे. या मशीनद्वारे उच्च रिझोल्युशनच्या प्रतिमा शल्यविशारदांना उपलब्ध झाल्यामुळे आणखी स्पष्टता मिळते. या मशीनमुळे ट्युमरच्या उपचारांबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते, शिवाय यामध्ये रक्ताच्या प्रवाहाचे चित्र दिसू शकते. या सर्व गोष्टींमुळे क्लिनिशियन्सना विशेषत: गुंतागुंतीच्या परिस्थितींमध्ये सुधारित निदान पद्धतींचा आत्मविश्‍वास मिळतो. यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक पद्धतीने केल्या जाऊ शकतात. ज्यात कमीत कमी रक्तस्त्राव होतो व रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.’

भारत फोर्जचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी म्हणाले, ‘पुण्यातील पहिले व सर्वांत मोठे रोबोटिक सेंटर म्हणून रुबी हॉल क्लिनिक हे आयुष्य बदलणार्‍या आजारांविरोधातील लढाईमध्ये अग्रस्थानी आहे. रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या गरजा लक्षात घेऊन हॉस्पिटलला सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे. मला खात्री आहे, की भविष्यातदेखील झपाट्याने बदलणार्‍या तंत्रज्ञानाचे अंगीकरण या हॉस्पिटलमध्ये होत राहील.’

ग्रांट मेडिकल फाउंडेशनचे विश्‍वस्त व अध्यक्ष डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, ‘हे अद्ययावत उपकरण आमच्या हॉस्पिटलला दिल्याबद्दल मी बाबा कल्याणी यांचे आभार मानतो. मला खात्री आहे, की या नवीन उपकरणांमुळे सर्व वयाच्या रुग्णांच्या इमेजिंग पद्धतींमध्ये सुधारणा येईल. अशा प्रकारच्या देणग्यांमुळे रुग्णांच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो व आम्हाला रुग्णांना सर्वोत्कृष्ट दर्जाची वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात मदत होते.’

रूबी हॉल क्लिनिकचे कामकाज अधिकारी डॉ. किशोर पुजारी म्हणाल, ‘शस्त्रक्रियेला सामोरे जाणार्‍या प्रत्येक रुग्णाला वाटते की, आपल्याला कमीत कमी वेदना व गुंतागुंत व्हावी आणि आपण लवकर बरे होऊन सामान्य जीवन जगावे. नवीन ‘हिताची अलोका अरीअट्टा एस ६०’मुळे हे शक्य होण्यास मदत होऊ शकते. या कमीत कमी छेद करणार्‍या उपकरणामुळे रोबोटला कमीत कमी छेद करण्यामध्ये मदत होते, ज्यामुळे कमी रक्तस्त्राव, कमी वेदना व कमी गुंतागुंत शक्य होते आणि रुग्ण लवकर बरा होतो.’

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले, ‘रोबोटिक तंत्रज्ञानाचा फायदा पुण्यात अनेक रुग्णांना झाला आहे. त्यामध्ये लक्ष्यित रेडिएशन उपचार ते कमीत कमी छेद करणार्‍या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. विज्ञान क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे अशा उपकरणांमुळे फिजिशियन्सच्या कौशल्यामध्ये अधिक सुधारणा होऊ शकते. हे आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञानाचे भविष्य आहे. आम्हाला खात्री आहे, की या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मोठा फायदा होईल. या महत्त्वाच्या ध्येयाला कल्याणी यांनी दाखविलेल्या कटीबद्धतेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. यापुढेही नवीन तंत्रज्ञानयुक्त उपकरणे रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपलब्ध होत राहतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search