Next
‘एमजी चेंजमेकर्स’ मोहिमेद्वारे कर्तृत्ववान महिलांची ओळख
‘एमजी मोटर इंडिया’चा उपक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, August 21, 2018 | 06:05 PM
15 0 0
Share this story

‘एमजीचेंजमेकर्स’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात पद्मश्री सुधा वर्गीस, चेतना सिन्हा, जबना चौधरी, डॉ. राणी बंग, कल्की सुब्रमण्यम, मोनिषा बेहल यांच्यासह नंदिता दास, तानया सिंह, निष्ठा सत्यम, पल्लवी सिंह सहभागी झाल्या होत्या.

मुंबई : ‘एमजी मोटर इंडिया’ने समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या भारतातील सहा कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ‘द बेटर इंडिया’च्या सहयोगाने ‘एमजी चेंज मेकर्स’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश या महिलांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख समाजाला करून देत, समाजातील अधिकाधिक महिलांना सकारात्मक बदल घडवण्यासाठी उद्युक्त करणे हा आहे. 

या सहा कर्तृत्ववान महिलांमध्ये पद्मश्री सुधा वर्गीस, महिला ग्रामीण बँकिंगच्या प्रवर्तक चेतना सिन्हा, भारताची सर्वात लहान सरपंच जबना चौधरी, डॉ. राणी बंग, ट्रान्सजेंडर कार्यकर्ता कल्की सुब्रमण्यम आणि नॉर्थ ईस्ट नेटवर्कच्या संस्थापक मोनिषा बेहल यांचा समावेश आहे. या उपक्रमाला ‘यूएन वुमेन इंडिया’चे सहकार्य लाभले आहे.

या महिलांच्या अद्वितीय कार्याची ओळख करून देण्याकरिता मुंबईत एक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात अभिनेत्री, दिग्दर्शक आणि सामाजिक कार्यकर्ती नंदिता दास,  द बेटर इंडियाच्या उप-संपादक तानया सिंह, भारत, भुतान, मालदिव आणि श्रीलंकासाठी ‘यूएन वुमेन’च्या एमसीओ निष्ठा सत्यम सहभागी झाल्या होत्या. या वेळी शिक्षण, काम, राजकीय, आर्थिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा समान सहभाग या विषयांवर चर्चा करण्यात आली.  

या वेळी नंदिता दास म्हणाल्या, ‘आपापल्या समुदायात प्रभावी कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्यास अधोरेखित करणाऱ्या या ‘#एमजीचेंजमेकर्स’ मोहिमेचे मी सहर्ष समर्थन करत आहे. अधिक समावेशक, इनोव्हेटिव्ह आणि समान भारत निर्माण करण्यात योगदान देणाऱ्या यशस्वी महिलांना एकत्र आणून अनौपचारिक संमेलन आयोजित करण्यात आले. ही खूप आनंदाची बाब आहे. या अभियानामुळे इतर महिला देखील प्रेरित होतील आणि स्वतःसाठी, आपल्या समाजासाठी आवाज उठवण्याची शक्ती त्यांना मिळेल, अशी मला आशा आहे.’

‘यूएन वुमेन’च्या निष्ठा सत्यम म्हणाल्या, ‘यूएन विमेनने ‘#एमजीचेंजमेकर्स’ मोहिमेस पाठिंबा दिला आहे. ही मोहीम ज्या मूल्यांवर आधारित आहे आणि त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या आमच्याशी सुसंगत आहेत. या मोहिमेस मिळालेला प्रतिसाद समाधानकारक आहे. महिला समुदायात जो प्रभाव पाडू शकतात त्याबाबत जी प्रत्यक्ष चर्चा सुरू झाली त्यातून खूप सकारात्मक दिशा मिळाली. हे सर्व खूप समाधानकारक आहे.’

एमजी मोटर इंडिया प्रा. लि. च्या मार्केटिंग प्रमुख पल्लवी सिंह म्हणाल्या, ‘आजवर पडद्यामागे राहिलेल्या, तळागाळातून काम करणाऱ्या, प्रभाव निर्माण करणाऱ्या प्रशंसेस पात्र अशा महिलांकडे प्रकाशझोत वळवण्यात ‘#एमजीचेंजमेकर्स’ मोहिमेला यश आले आहे. 

‘द बेटर इंडिया’च्या उप संपादक तानया सिंह म्हणल्या, ‘आमच्या प्रकाशनगृहात आमचा भर नेहमी प्रभावी कथाकथनावर असतो. भारतात परिवर्तन घडवणाऱ्या या सहा महिलांच्या प्रेरक कथा आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. या मोहिमेचे यश आम्हाला आनंदित करणारे आहे.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link