Next
लोकहितवादी
BOI
Sunday, February 18 | 03:45 AM
15 0 0
Share this story

लोकहितविषयक, प्रबोधनपर निबंध लिहिणारे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख या विद्वान समाजचिंतकाचा १८ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.............
१८ फेब्रुवारी १८२३ रोजी पावसमध्ये जन्मलेले गोपाळ हरी देशमुख हे समाजचिंतक आणि इतिहासलेखक म्हणून ओळखले जातात. मूळ सिद्धये घराण्याला बारा गावांची देशमुखी मिळाल्याने त्यांच्या घराण्याला ‘देशमुख’ हे आडनाव मिळालं आणि तेच रुळलं. गोपाळरावांनी समाजाच्या प्रबोधनासाठी आपली लेखणी उचलली होती. 

मनात आलेले विचार ते भराभर मोडी लिपीमध्ये लिहून ठेवत आणि त्यानंतर त्यांचे स्नेही वामन बाळकृष्ण रानडे ते सर्व मराठी हस्ताक्षरात उतरवून ठेवत असत अशी नोंद आहे. मुंबईच्या ‘प्रभाकर’ वृत्तपत्रात त्यांनी ‘लोकहितवादी’ हे टोपण नाव घेऊन लोकहितविषयक निबंध लिहिले, ते ‘शतपत्रे’ नावाने प्रसिद्ध झाले होते. प्रत्यक्षात असे १०८ निबंध त्यांनी लिहिले होते. 

ब्रिटिशांनी त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ आणि ‘रावबहाद्दूर‘ अशा पदव्यांनी, तसंच ‘फर्स्ट क्लास सरदार’ म्हणून गैरविलं होतं.

भरतखंडपर्व, पानिपतची लढाई, ऐतिहासिक गोष्टी, गुजरात देशाचा इतिहास, लंकेचा इतिहास, सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास, उदेपूरचा इतिहास, पंडित स्वामी श्रीमद्‌ दयानंद सरस्वती, गीतातत्त्व, सुभाषित अथवा सुबोध वचने, स्वाध्याय, आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण, आश्वलायन गृह्यसूत्र, आगमप्रकाश, निगमप्रकाश, जातिभेद, भिक्षुक, प्राचीन आर्यविद्या व रीती, होळीविषयी, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

नऊ ऑक्टोबर १८९२ रोजी पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link