Next
‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक २०१७’स्पर्धेचे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, December 16 | 05:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘एसएई इंडिया’ (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स), एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), ‘इटॉन टेक्नॉलॉजी’, ‘जॉन डियर’, ‘अल्टिर’ आणि आणि व्हिजीए डिजीटल प्रिंटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहनांची छोटी मॉडेल्स तयार करण्याच्या ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक २०१७’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी,  १७ डिसेंबर रोजी या ‘ए डब्ल्यू आय एम पुणे ऑलिंपिक’चे उद्घाटन  सकाळी 9 वाजता होणार आहे, अशी माहिती माहिती डॉ. के. सी. व्होरा (उपाध्यक्ष, एसएई इंडिया) यांनी दिली. ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक’ एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे.स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. 

इटॉन , ‘जॉन डियर’आणि ‘एआरएआय’सारख्या कंपन्यांतील १३० पेक्षा जास्त स्वयंसेवक दरवर्षी २५पेक्षा जास्त शाळांना आणि पुण्यातील २०० विद्यार्थ्यांना ‘स्टीम’ आणि ‘नेक्ट जनेरेशन सायन्स’च्या माध्यमातून मनोरंजनासाठी आणि खेळण्यासाठी मदत करत आहेत. इटॉन आणि ‘जॉन डियर’, ‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक’ चे प्रायोजक आहेत.

देशातील ऑटोमोबाईल अभियंत्यांची गरज वाढत असून, या क्षेत्रात कारकीर्द करण्याबद्दल जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील मूलतत्त्वे छोटी मॉडेल्स तयार करून शिकणे हा ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या उपक्रमाचा उद्देश आहे. या स्पर्धांमधून देशाचे भावी ‘इंजिनियर्स’ घडणार आहेत.

‘अ वर्ल्ड इन मोशन पुणे ऑलिंपिक’ मधील विजेता भारतातील इतर ३५ शहरातील विजेत्यांसह १० व्या राष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेणार आहे. ही स्पर्धा जानेवारी २०१८ मध्ये कमिन्स, बालेवाडी येथे होणार आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link