Next
सिंहगड रस्त्याचा पर्यायी मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला
प्रेस रिलीज
Tuesday, November 20, 2018 | 01:39 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘सिंहगड रस्ता आणि परिसरात शहरातील विविध भागांमधून स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. यामुळे वाहतुकीवर ताण येत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आम्ही उड्डाणपुलाअगोदर पर्यायी रस्त्याच्या कामाला प्राधान्य दिले. गेल्या काही दिवसांत या पर्यायी रस्त्याचे काम वेगाने चालू असून, लवकरच हा रस्ता वापरासाठी खुला होईल,’ अशी माहिती नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी दिली.

पु. ल. देशपांडे उद्यान ते फनटाइम अशा साडेचार किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यातील जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात फनटाइम ते विश्रांतवाडीपर्यंतचा तीन किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या सध्या चालू असलेल्या पर्यायी रस्त्याच्या कामाची नागपुरे यांनी नुकतीच पाहणी केली व अधिकाऱ्यांना हा मार्ग लवकरात लवकर खुला करण्याचे आदेश दिले.‘आतापर्यंत या पर्यायी मार्गासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता अभिजित डोंबे व उपअभियंता विठ्ठल इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल,’ असे नागपुरे यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
vivekanand date About 86 Days ago
very good work
0
0
Dilip kulkarni Hassya club Anand maruti About 91 Days ago
Khup change kam great work you are doing 👍👍👍👍🙏🙏🙏
0
1
Sunil Rasal About 91 Days ago
Great job very nice
0
0

Select Language
Share Link