Next
रत्नागिरीत संस्कृत शिक्षण केंद्र सुरू
BOI
Wednesday, October 03, 2018 | 12:31 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थान व रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र सुरू होत आहे. नव्या वर्गाचे उद्घाटन १० ऑक्टोबरला होणार आहे.

या वेळी संस्कृत भारतीचे पदाधिकारी शिरीष भेडसगावकर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या केंद्रामध्ये संस्कृतचे शिक्षण दिले जाते. सध्या सकाळी ११.३० ते १२.३० व सायंकाळी चार ते पाच या वेळेत संस्कृतचे वर्ग घेण्यात येणार आहेत. संस्कृत शिकण्याची इच्छा असलेले विद्यार्थी, नोकरदार, उद्योजक, डॉक्टर अशी कोणीही जिज्ञासू व्यक्ती या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकते. संस्कृतचे पूर्वज्ञान आवश्यक नाही. संस्कृत  ही वैज्ञानिक भाषा आहे. संस्कृत भाषेत अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. संस्कृत भाषा हा आपला समृद्ध वारसा आहे. यासाठी संस्कृतचे ज्ञान सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच अभ्यासक्रमाची पुस्तके मोफत असून, प्रमाणपत्र दिले जाते. संस्कृत श्रवण, संभाषण, वाचन, लेखन अशा भाषा कौशल्यांचे अध्यापन केले जाते.

अधिक माहितीसाठी संपर्क :
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग,
डॉ. कल्पना आठल्ये -  ७७२०० ३२३०२, हिरालाल शर्मा - ८८९४६ ४९५१४

(गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत दिन कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 83 Days ago
How would they use it in everyday life ? Its grammr makes it difficult to learn . Can it it be simplified ? Chinese have achieved this .
0
0

Select Language
Share Link
 
Search