Next
बिग बाजारतर्फे ‘फ्री शॉपिंग वीकेंड’
प्रेस रिलीज
Wednesday, March 21, 2018 | 04:41 PM
15 0 0
Share this story

पुणे :  फ्युचर ग्रुपच्या आघाडीच्या हायपरमार्केट शृंखलांपैकी एक असलेल्या बिग बाजारने २३ ते २५ मार्च पर्यंत पहिल्या  ‘फ्री शॉपिंग वीकेंड’ची घोषणा केली आहे. बिग बाजारच्या देशातील दोनशे पन्नासपेक्षा जास्त स्टोर्समध्ये ‘फ्री शॉपिंग वीकेंड’ होईल. याअंतर्गत ग्राहकांना किमान दोन हजार रुपयांची खरेदी करावी लागेल आणि त्यांना एक हजार  रुपयांचे अॅपरेल व्हाऊचर्स, पाचशे रुपयांचे घरगुती आणि पाचशे रुपयांची किचनवेअर उत्पादने  खरेदीची संधी व्हाऊचर्सच्या माध्यमातून मिळेल.
 
यात अन्य ऑफर जोडताना, सर्व नवीन फ्युचर पे (ई-वॉलेट) वापरकर्त्यांना पाचशे रुपयांची कॅशबॅक मिळणार असून ती दोन हजार रुपये  किंवा त्यापेक्षा जास्तवर लागू असेल. या मोफत शॉपिंग वीकेंडमध्ये स्टेपल्स, खाद्यपदार्थ, मसाले, चहा, शीतपेये, फूटवेअर, होम केअर उत्पादने, होम फॅशन, किचनवेअर इ. विविध प्रकारच्या उत्पादनांवर सर्वोत्तम ऑफर मिळतील.
 
या मोहिमेविषयी बोलताना बिग बाजारचे सीईओ सदाशिव नायक म्हणाले, ‘ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच आपल्या ग्राहकांना काहीतरी अधिक देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बिग बाजारमध्ये खरेदी करणे हे आनंददायक ठरते. फ्री शॉपिंग वीकेंडमुळे आमच्या ग्राहकांना खरेदी करण्याचे अधिक आनंद मिळेल आणि ते ताणमुक्त खरेदीचा आनंद घेऊ शकतील. ग्राहक एकाच किमतीत दुप्पट खरेदी करू शकतील आणि आमच्या विविध उत्पादनांमधूनही अधिक खरेदी करू शकतील. आम्ही ग्राहकांना या प्रकारच्या प्रथम ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणण्यासाठी आमंत्रित करतो.’
 
ज्या ग्राहकांना मोफत शॉपिंग वीकेंड ऑफर चुकवायची नसेल ते फक्त शंभर रुपयांचे तिकिट विकत घेऊन पूर्व नोंदणी करू शकतात आणि त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकतात.  http://bit.ly/PreBookFSW  या ठिकाणी पूर्व नोंदणी करता येईल. याशिवाय, बिग बाजारने रूपेशी भागीदारी केली आहे ज्याद्वारे ग्राहक सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्ड खरेदीवर दहा टक्के  सूट मिळवू शकतात.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link